५६
Wednesday, February 25, 2009 3:59:54 AM
जेमतेम १०-१५ दिवस काय ते खुप थंडी वाटली. बाकीचे सगळे दिवस सुमार गारव्याचे गेलेत. आणि आता तर.. म्हणजे गेल्या आठवड्यापासुनच बऱ्यापैकी गरम वाटायला लागलंय. ऑफिसमध्ये तरी दिवसभर ए.सी.मध्ये असतो, पण त्यातुन बाहेर पडलं की जरा जास्तीच गरम वाटायला लागतं मग. ए.सी. मध्ये बसुन काम करण्याचा हा एक तोटा आहेच.नुकतीच महाशिवरात्री झालीये. असं म्हणतात की महाशिवरात्रीपासुन उकाडा वाढतो. उन्हाळ्याची चाहुल देणारा काळ सुरु झालाय. एकुणच आत्ताची गरमी बघता, उन्हाळा तसा बऱ्यापैकी भाजुन काढणारा असु शकतो.
(निदान तशी शक्यता तरी नाकारता येणार नाही.) वऱ्हाड आणि विदर्भ म्हणजे उन्हाळ्यातले अगदी "हॉट स्पॉट"च! काय भयानक तापमान असतं तिकडं.. अशावेळी भरमसाट झाडांची कमतरता आवर्जुन जाणवते मग.खुप झाडं असती तर किती छान झालं असतं...
प्रत्येक घरावर त्या झाडांची सावली पडली असती दुपारच्या वेळी...
रस्त्यानी येता-जाता उन्हाचा त्रास जाणवला तर लगेचच झाडाखाली थांबुन थोडावेळ विश्रांती घेता आली असती...
डोळ्यांनाही ती हिरवळ पाहुन जरा बरं वाटलं असतं..
तसं झाडं अगदीच नाहीयेत असं नाहीये, पण जेवढ्या प्रमाणात पाहिजेत तेवढ्या प्रमाणातही नाहीयेत...

झाडांचं संवर्धन करण्यात पुणे महापालिका कमी पडते आहे असं वाटतं मला कधी कधी..
म्हणजे आता बघा, गेल्या काही दिवसांपुर्वीचीच गोष्ट. राजारामपुलाजवळ मातोश्री वृद्धाश्रम आहे. त्याच्याजवळच्या चौकात रस्ता रुंद केला महानगर पालिकेनी. तिथं दोन मोठी झाडं होती. खोडापासुन तोडली आहेत ती रस्त्ता रुंद करण्यासाठी. खोडं तशीच आहेत तिथं.. म्हणजे झाडं तर गेलीच.. पण खोडांचा अडथळा राहणारच! फायदा काय मग ती झाडं तोडण्याचा?
मला आठवतंय, नाशिकला जेव्हा मुंबई-आग्रा महामार्गालगत सर्विस रोड बनवण्याचं काम चालु होतं, तेव्हा सुद्धा अशाच अनेक झाडांचा अडथळा होता. पण नाशिक महानगरपालिकेनं एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम केला. त्यांनी ती सगळी झाडं अक्षरशः मुळासकट काढली, आणि गंगापुर रोडलगत परत लावली.. ती सुद्धा यशस्वीपणे! जगवली ती झाडं तिथं!!! त्यामुळं सर्विस रोडचं तर काम झालंच, पण झाडं सुद्धा वाचली.

पुणे नक्कीच मोठ्ठ आहे नाशिकपेक्षा. आणि पुण्यात अजुनही बरीच झाडं आहेत.
इथली महानगरपालिका सुद्धा हा उपक्रम नक्कीच राबवु शकतेय..
गरज फक्त इच्छाशक्तीची आहे.

Anonymous # Wednesday, February 25, 2009 11:32:28 AM
Prabhas Gupteprabhas # Wednesday, February 25, 2009 12:56:40 PM
Thanks a lot!!
Anonymous # Thursday, February 26, 2009 6:12:22 AM