अजि म्या आयुका पाहिलं..!
Saturday, February 28, 2009 12:59:33 PM
खरंतर मी या दिवसाची गेल्या कित्येक दिवसांपासुन वाट बघत होतो. कारण आजच्या दिवशी पुणे विद्यापीठाच्या आवारातील "आयुका" मध्ये मुक्त प्रवेश असतो. एरवी विशेष परवानगी असल्याशिवाय तिथं प्रवेश मिळत नाही. आणि मला ते आयुका आतुन बघायचं होतं म्हणुन तर मी या आजच्या दिवसाची वाट बघत होतो! पण आज सकाळी मात्र मी ठार विसरुन गेलेलो... अचानकच पुणे विद्यापीठाकडे जाण्याचा योग आला आणि गेट वरची गर्दी बघुन लगेचच डोक्यात ट्युब पेटली.. अरे!!! आज विज्ञान दिन आहे!!!मनसोक्त भटकुन घेतलंय मी आतमध्ये.. उन्हाचे चटके बसत होते, पण हवी असलेली गोष्ट मिळाल्यावर कसली पर्वा?? तिथल्या पुतळ्यांचे फोटो काढलेत. ’आयुका’ नावाच्या फोटो अल्बम मध्ये लावलेत मी, ते जरुर बघा. दोन पुतळ्यांसोबत माझे सुद्धा फोटो काढुन घेतलेत.

असं अचानक घबाड हाती लागावं तसं झालंय माझं.

Anonymous # Tuesday, March 3, 2009 12:47:06 PM
Prabhas Gupteprabhas # Tuesday, March 3, 2009 12:49:45 PM
ho, khup chhan aahe na te?