६४
Thursday, March 5, 2009 3:44:07 PM
गेले काही दिवस मी रात्री साडे-आठ, नऊ वाजता घरी येत होतो. आज मात्र सात वाजताच आलो.
त्यामुळं ब्लॉगवर लिहायला सुद्धा वेळ मिळालाय.नाहीतर अगदी कुंभकर्णासारखा झोपलाच होता हा ब्लॉग... पण नाही! आज मला वेळ मिळाला आणि गाढ झोपी जाण्यापासुन हा ब्लॉग वाचला.
आजकाल कामाचा बोजा एवढा वाढलाय म्हणुन सांगु... जरा म्हणुन मोकळा वेळ मिळत नाहीये मला.
आज जरा, अगदी जरा मोकळीक मिळताच त्याचा फायदा मी लगेचच उचलला.. आणि लवकर कल्टी मारली. तसा सहा वाजताच निघणार होतो, पण काही ना काही कारणानी थांबत थांबत पाउणे सात वाजता निघालोच. मग लगेचच हाय-वे नी पंधरा मिनिटांत घर गाठलं.
या शनिवार-रविवार नाशिकला जाण्याचा विचार आहे. बऱ्याच दिवसांपासुनचं चालु आहे माझं.. गेल्या तीन वेळा जाईन-जाईन म्हटलं आणि काही ना काही निघाल्यानी राहिलंच.
या वेळी मात्र जायचंच असं ठरवलंय.
ता.क.: नुकतंच मी जेम्स बॉंडवर आधारीत "थंडरबॉल" हे पुस्तक वाचलं. जाम कंटाळवाणं पुस्तक आहे ते. मला वाटलेलं मस्त काहीतरी इंटरेस्टींग वाचायला मिळेल.. पण छे!!

How to use Quote function: