६७
Sunday, March 8, 2009 9:27:15 AM
सकाळी उशीरा उठणं..
त्या आधीच जाग आलेली असते, तरी पण लोळत पडणं... 
मग सावकाश, पेपर चाळत चाळत चहा पिणं...

आरामात बसुन टि.व्ही. पाहणं...
आंघोळीच्या पाण्याची बादली भरली की मग शिस्तीत आंघोळीला जाणं...

सगळं उरकुन परत टि.व्ही. समोर बसुन भारत-न्युझीलंड क्रिकेट मॅच पहात बसणं..
सोबत "सही!!", "अरेरे...", "व्वा!!", "झक्कास!" असे काहीसे उद्गार काढत राहणं..

भारतानी उभारलेल्या मोठ्ठा धावसंख्येचं तोंड भरुन कौतुक करणं..
पण न्युझीलंड सुद्धा धुलाई करतंय..
छे!! आपल्या टिममध्ये काही दमच नाहीये...
या आणि अशाच अन्य काही ’एक्स्पर्ट कॉमेंट्स" देणं..
तोवर स्वयंपाक घरातुन शिजलेल्या मटणाचा वास हवेतुन तरंगत तरंगत नाकात शिरायला लागतोच!
आणि मग त्या मटणावर तुटुन पडणं...

जेवणानंतर मस्त मसाला पान खाणं..
आणि परत मॅच लावणं.. अरे व्वा! झटक्यात चार विकेट्स गेल्यात की!!!

परत मुड बनवुन टि.व्ही. समोर, पुन्हा एकदा...!
मॅच भारताकडेच आहे, ...पण नाही, किवींना सुद्धा चान्स आहे.. कडवा प्रतिकार.. आपण हरणार बहुतेक..
..नाही!! जिंकलो बुवा एकदाचं..

बास्स!! आता संध्याकाळी मित्रांसोबत चकाट्या पिटायच्या..!
याहुन चांगला रविवार कसा असतो?

Anonymous # Wednesday, March 11, 2009 6:18:18 PM
Prabhas Gupteprabhas # Thursday, March 12, 2009 3:08:55 AM
Happy Holi to you as well!!
Unfortunately, I had office on the day of Holi, so could not celebrate
Perhaps, Rang-panchami is there, and you know what, its Sunday!!!!
So I gonna celebrate colours with my friends here on Rang-Panchami.
And about the shortage of water, we can celebrate with dry color-powders!
Right?