७४
Sunday, March 15, 2009 7:26:53 AM
भैय्या..
अरे यार, मुलींना का एवढा आवडतो हा शब्द?? अनोळखी मुलांना जरा काही विचारायचं असलं की त्या प्रश्नाची सुरुवात "भैय्या" याच शब्दानं होते..
दुसरा कोणता शब्द सापडत नाही काय यांना??? मगाशी आईला दुकानात घेऊन गेलो होतो. ती दुकानात वस्तु खरेदी करत होती तोवर मी बाहेर गाडीवर बसुन होतो. तेवढ्यात एक मुलगी आली गाडीवरुन.
"भैय्या, आकाशदीप सोसायटी कुठं आहे?"
(चेहरा रुमाल गुंडाळुन गुंडाळुन झाकलेला, डोळे सुद्धा गॉगल मागं लपवलेले.. त्यामुळं किती सुंदर होती ते काय कळलं नाय बघा, हा, पण आवाज मात्र गोड होता.. )
"ती काय, समोरच!! सरळ जा एकदम.."
"ते गेट दिसतंय ते का?"
"हो तेच.."
(मी एकदम स्माईल वगैरे देऊन..)"थॅंक्यु भैय्या!"
असला जळफळाट झाला म्हणुन सांगु!! अरे काय हे? साधं सरळ, "अरे इकडं आकाशदीप सोसायटी कुठं आहे?" असं नव्हतं का विचारता येत?
आणि शेवटला नुसतंच "थॅंक्यु" पण म्हणु शकलीच असती ना?? कशाला पाहीजे ’तो’ शब्द???
नाही ना बाई मागे लागत तुझ्या.. नुसत्या या एका वाक्याच्या बोलण्यानं मागे लागायला आम्ही पण काय ’हे’ नाही आहोत म्हटलं..
हे असं जबरदस्तीनं भाऊ नाही बनवायचं.. धिस इज चिटींग..!
आम्ही करतो का असं जबरदस्तीनं ’ताई’? नाही ना? मग आम्हालाच का असं करता तुम्ही??
छे बुवा, आपल्याला नाही आवडत असलं काही..
"एक्सक्युज मी भैय्या, मुझे उस साईड जाना है.." (जा की मग, मी कुठं अडवलंय?)
"भैय्या जरा गाडी काढायला मदत करणार?" (हो हो, करतो ना!)
"भैय्या टाईम क्या हुवा?" (अरे ’पावणे-बारा’ला हिंदीत काय म्हणतात सांगा रे कोणी पटकन..)
भैय्या भैय्या भैय्या... वैताग आणलाय या शब्दानं...


Anonymous # Sunday, March 15, 2009 5:29:15 PM
Anonymous # Monday, March 16, 2009 4:26:16 AM
Anonymous # Monday, March 16, 2009 4:50:01 AM
Prabhas Gupteprabhas # Monday, March 16, 2009 5:23:36 AM
pan ka??? ka asa karatat muli?
Anonymous # Monday, March 16, 2009 10:07:03 PM
Prabhas Gupteprabhas # Tuesday, March 17, 2009 2:29:53 AM
perfect Tit-for-Tat
Anonymous # Thursday, March 19, 2009 6:58:19 AM
Anonymous # Thursday, March 19, 2009 8:44:35 AM
Prabhas Gupteprabhas # Thursday, March 19, 2009 10:24:50 AM
Thanks!
@ Aniket,
Are ho, te chalat.. Pan tyacha nako adhar ghyayala.. Nahitar porgi mhanayachi, "kasa ka asena, bhau ch na?"