कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

८०

,


आज सकाळचीच घटना.

मी काही कामानिमीत्त बाहेर चाललेलो.
वाटेत सिग्नल लागला म्हणुन थांबलो.
माझ्या पुढं बऱ्याच गाड्या होत्या.. दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी.

थोड्याच वेळात माझं लक्ष माझ्या पुढ्यातल्या गाडीवाल्याकडं गेलं.. "अरे! हा तर पंकज आहे की!!"
पंकज, माझा एम.सी.एस. मधला मित्र. आता नगरला असतो.
म्ह्टलं, हा पठ्ठ्या पुण्यात आलाय, गाडीवरुन भटकतोय चांगला आणि मला फोन पण नाही केला माठ्यानं..
म्हणुन मग त्याचं लक्ष वेधुन घ्यायला मी हॉर्न वाजवला गाडीचा.

एकदा... दोनदा.. तरी काही त्याचं लक्ष जाईना/येईना माझ्याकडं.. worried

मग मी अजुनच जोरजोरात हॉर्न वाजवला. तरी नाहीच!! काय बहीरट आहे यार हा..

पण झालं काय, त्याच्या ऐवजी त्याच्या आजुबाजुचेच लोक मागे वळुन बघायला लागले. वैतागले ना ते माझे हॉर्न ऐकुन ऐकुन! mad irked
मी त्यांतल्याच एकाला खुणेनं सांगितलं, "जरा त्याला बोलवा हो.." आणि त्यांनी बोलावलं..

त्या व्यक्तीनं मागे वळुन पाहीलं तर खरं... पण माझा तर पोपटच झाला की!! तो पंकज नव्हताच!!!!! no

पंकजसारख्या शरीरयष्टीचा दुसराच कोणीतरी होता.. आयला.. असला मोठ्ठा पचका झाला म्हणुन सांगु!!! o

नशीब, तेवढ्यातच सिग्नल सुटला म्हणुन.. नाहीतर आजुबाजुच्या लोकांनी माझं लोणचंच घातलं असतं..

आय.आय.टी. ची एनिग्मा २००९ पार केली!!! ८१

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies