कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

९९

,

काल पुन्हा एकदा माझ्यातला मस्तीखोरपणा बाहेर उसळुन आला. पण या वेळी मी ’हायटेक’ मस्ती केलीये. devil wink

मी एक प्रोग्रॅम केलाय. गुगल-टॉकसाठीचं ’ऑटो-रिप्लाय टुल’. खरंतर त्याचा मुळ उद्देश असा की, तुम्ही कॉम्प्युटरपासुन दुर असाल, आणि कोणी तेव्हा तुम्हाला काही मेसेज पाठवला गुगल टॉकवर तर त्याला आपोआपच उत्तर जाईल.. तुम्ही आधीच ठरवुन ठेवलेलं उत्तर! smile

पण मी मात्र याच टुलचा वापर मस्तीसाठी केला. smile मी काय केलं, काल ऑफिसमधुन निघतांना माझ्या गुगल टॉकवर ते टुल सुरु करुन आलो. आणि त्यात ऑटो-रिप्लाय ठेवला "बोल ना!" कोणीपण मला त्यावर मेसेज टाकला, पिंग केलं तर त्या प्रत्येक मेसेजला "बोल ना!" हे एकच उत्तर जाणार... आपोआप. ते सुरु केलं आणि मी निघुन आलो. bigsmile

काल रात्री मात्र मानसी, अमोल, आणि धन्या या जाळ्यात आयतेच सापडले. bigsmile मला तर हसुच आवरत नाहीये! सगळ्यांची संभाषणं वाचुन..! इथं खालती दिलीत ही संभाषणं, ’Read more...’ वर क्लिक करा ती वाचण्यासाठी. smile
[/ALIGN]



मानसी आणि माझ्यात(माझ्या प्रोग्रॅममध्ये) झालेलं संभाषण असं:
मानसी: हाय!
खोटा मी: बोल ना!
मानसी: काय चालु आहे???
खोटा मी: बोल ना!
मानसी: बोलत तर आहे..
खोटा मी: बोल ना!
मानसी: मी तुला एक प्रश्न विचारलाय.
खोटा मी: बोल ना!
मानसी: आता त्याचं उत्तर दे.
खोटा मी: बोल ना!
मानसी: ओके, बाय.
खोटा मी: बोल ना!
मानसी: टाटा
खोटा मी: बोल ना!
मानसी: तु बोलणार आहेस की मी जाऊ?
खोटा मी: बोल ना!
मानसी: जा उडत...
खोटा मी: बोल ना!
knockout
मला तर हसुच आवरत नाहीये!

पाठोपाठ अमोल..
अमोल: हाय
खोटा मी: बोल ना!
अमोल: रिबुटचे काय चालु आहे?
खोटा मी: बोल ना!
अमोल: कधी आहे गेट-टुगेदर?
खोटा मी: बोल ना!
अमोल: अरे, गेट-टुगेदरचे
खोटा मी: बोल ना!
अमोल: ???????
खोटा मी: बोल ना!
अमोल: काही मेसेज भेटतोय का?
खोटा मी: बोल ना!
अमोल: रिबुटचे काय?
खोटा मी: बोल ना!
अमोल: ???
खोटा मी: बोल ना!
अमोल:तुला मेसेज दिसत नाही का?
खोटा मी: बोल ना!
अमोल: रिबुटचा प्रोग्रॅम कधी..
खोटा मी: बोल ना!
अमोल: ?
खोटा मी: बोल ना!


आणि धन्या - धनंजय अहिरराव सुद्धा
धन्या: हाय
खोटा मी: बोल ना!
धन्या: तुम्ही बोला
खोटा मी: बोल ना!
धन्या: ओके
खोटा मी: बोल ना!
धन्या: काही लोक माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. जसं की "भोगे"
खोटा मी: बोल ना!
धन्या: ज्ञानेश्वर कोठावदे, नाशिकचा.
खोटा मी: बोल ना!
धन्या: भोगे कल्याणचा.. आपले SY, TY चे क्लासमेट्स.
खोटा मी: बोल ना!
धन्या: त्यांना आमंत्रण दिलंय.
खोटा मी: बोल ना!
धन्या: तु आहेस तिथे?
खोटा मी: बोल ना!
धन्या: अरे रिप्लाय कर ना
खोटा मी: बोल ना!
धन्या: अरे किती बोलु?
खोटा मी: बोल ना!
faint

[/ALIGN]

९४१०१

Comments

Anonymous Thursday, April 9, 2009 12:24:19 PM

http://manatale.wordpress.com writes: मज्जेदार

Anonymous Thursday, April 9, 2009 7:18:14 PM

Ritulika writes: Funny!

Anonymous Monday, April 20, 2009 12:39:26 PM

Pragati writes: How Funny..:-) Prabhas...tu pan na lokana vedyat kadhyla 1 no aahes... aaj barach diwsani tuze blog readayla ghetle...2-3 month b4 readyche aaj kal velch nasto farsa.. pan aata week madhun 1da tari nakki readin ..maja yete ni main mhnje sara thakava palun jato.... Seriously... bye TC :-)

Prabhas Gupteprabhas Monday, April 20, 2009 3:23:29 PM

Hi Pragati, Welcome back!! bigsmile

mala 1st number dilas, bare watale.. chala,, kuthe tari mi 1st aloch!! cool

maza blog lihayala, ani mag mich parat wachayala mala pan maja yete. smile
ani maza thakava lihita lihita palun jato. wink

Anonymous Tuesday, April 21, 2009 7:16:03 AM

Pragati writes: Thanks....:-)

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies