१०१
Saturday, 11. April 2009, 06:08:21
मस्तपैकी झोप पुर्ण झाल्यावरच मी बिछान्यातुन बाहेर पडलेलो आहे. नेहेमीप्रमाणेच आरामात बसुन चहा प्राशन झाल्यावर, सवयीनुसार आंघोळ उरकलेली आहे. आणि "आता काय करावं.." या विचारात गर्क असतांनाच नेहेमीच्या सवयीनं ई-मेल चेक करुन झाल्या आहेत. खुप काही ई-मेल नाहीयेत आलेल्या, बास १२-१५ होत्या. त्यातल्या काही नेहेमीच फॉर्डवर्ड होणाऱ्या, दोन आलेल्या लिंक्ड-ईन कडुन, आणि एक आलेली विकीपिडीया कडुन. या वाचुन झाल्यात. सतत फिरणाऱ्या ई-मेल्सना ’Mark as Read' करुन झालंय. आणि आत्ताच 'Ocean's Eleven' हा पिक्चर सुरु केलाय. कानांना हेडफोन लटकवलाय, जेणेकरुन इतरांना त्रास होणार नाही आवाजाचा, आणि बघत बसलोय. हा पिक्चर पाहण्याची ही दहावी वेळ. माझ्या लॅटपॉटवर हाच एकमात्र पिक्चर आहे. पण त्यातल्या स्ट्रॅटेजी मला आवडतात, त्या ओशनचा करारीपणा भावतो म्हणुन मी बघतो. थोड्याच वेळात पळवत-पळवत मी हा पिक्चर संपवेनच. मग बघु काय करायचं ते.
तुमचं काय चालु आहे सध्या? बऱ्याच दिवसांत तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या नाहीयेत. आजकाल ब्लॉगवर लिहायला सुद्धा काही सुचत नाही जास्ती. काही सुचलंच तर त्यावर फारसं लिहीलं जात नाही. थंडच पडल्यागत झालाय हा ब्लॉग. पण मला खात्री आहे, काही ना काही सापडेलच मला. आज संध्याकाळी कुठेतरी भटकुन येईन म्हणतो. कदाचित एन.डि.ए. रोडला जाईन. किंवा मग खडकवासला कडं.. नारायणपुरला सुद्धा जाऊन यायचं आहे एकदा. बघु कधी चान्स मिळतो ते. अजुन बऱ्याच जागा बाकी आहेत जिथं मी अजुन गेलो नाहीये. कधी कधी असं वाटतं मस्तपैकी बाहेर भटकायला पडावं आणि नुसतंच या जागेवरुन त्या जागेवर, तिकडुन अजुन तिसरीकडं असं भटकत बसावं. अगदी त्या कोलंबसासारखं.. प्रवासी प्रभास.
तसा माझा पिंड अगदी भटक्याचाच. भटकायला खुप आवडतं मला. पण कामाच्या-नोकरीच्या पसाऱ्यामुळं बऱ्याचदा मला माझे प्लान्स गुंडाळुन ठेवायला लागले आहेत. त्यातुन मला आजकाल फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट यायला लागलाय. पण म्हणावं तेवढं नीट नाही जमत मला अजुन. बऱ्याचवेळा मी कसलातरी फोटो क्लिक करतो. अगदी वेगवेगळ्या कोनांतुन काढतो. पण घरी येऊन लॅपटॉपवर पाहिला की काही खास वाटत नाही. मग सरळ डिलीट करतो मी त्याला. असे बरेच फोटो आत्तापर्यंत डिलीट करुन झालेत माझे. मोबाईलच्या कॅमेऱ्यानी जरा निट फोटो काढता यायला लागले की मग डिजीटल कॅमेरा घेईन म्हणतो. एक-ना-एक दिवस चांगला फोटोग्राफर बनेनच मी.. फोटोग्राफर प्रभास..!
वाचायलाही काही पुस्तक मिळालं नाहीये चांगलं. मग काल पासुन माझाच ब्लॉग परत वाचायला सुरुवात केलीये. तशा बऱ्यापैकी बऱ्या लिहील्यात मी पोस्ट. अगदीच काही वाईट नाहीये.
ता.क. :
आज सकाळीसच Ocean's Eleven पाहिला हिंदीमध्ये डब केलेला. आणि आज रात्री झी-मराठीवर तोच पिक्चर आहे मराठी मधुन!! माझी तर चांगलीच चंगळ चालु आहे की..
काहीही म्हणा, हे हॉलिवुडपट मराठीमधुन बघायला जाम मजा येते पण. ते इंग्रजी चेहरे, त्यांच्यातोंडी मराठी भाषा.. एकदम कॉमेडी वाटतं मग.


Anonymous # 13. April 2009, 19:29
yeah, its really funny to watch dubbed hollywood movies. I remember watching Hindi version of Godzilla; it totally cracked me up! I guess that was the last dubbed movie I watched.
I think you are doing really well as Blogger. Photographer...umm...you can easily blame it on your camera! :)
BTW have you been to "Pawan khind"? Recently a friend of mine visited this place near Pune. I was very impressed with the pictures. Definitely wanna go there next time I am in Pune.
Prabhas Gupte # 14. April 2009, 01:47
I would say, watching hollywood movies dubbed in Hindi is OK, but in Marathi.. its lot more funny!!
Pan Zee Marathi ni dubbing karatanna tya dialogues chi paar waat lavun takaleli. Aso.
Thanks for complement to blogger in me.
Photography.. One cannot expect me to showcase magic with just 1.3 MP mobile camera!!
(following your advice..)
I have never been to "Pawan Khind". Ritulika, thanks a lot for reminding me of this place!! Mazi kadhi pasun chi ichchha aahe, Bajiprabhu Deshpande sarakh tya khindi madhe ubha rahun photo kadhaychay
Mi jainach tikade lavkarach.