कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

१०२

,

समजा, सगळे सॉफ्टवेअर अगदी स्वस्तात मिळायला लागले तर..? idea
म्हणजे बघा, आपण इमॅजिन करुन बघुया... rolleyes

अशी सगळीकडं सॉफ्टवेअरची दुकानं असतील...
समजा अप्पा बळवंत चौकात.

आपण ही कव्हर्स वाचत वाचत दुकानांमागुन दुकानं पालथी घालत फिरत असणार..

साड्यांच्या दुकानांमध्ये कशा नविन स्टाईलच्या साड्या बाहेर लटकवलेल्या असतात,
तसंच सॉफ्टवेअरच्या सिड्यांची कव्हर्स लटकवलेली असतील.. p

आपण अशाच एखाद्या दुकानात जाऊ..
काऊंटरवर प्रचंड गर्दी असेल..

आपल्याला चान्स मिळाला की आपण हातातली पिशवी काखेत मारत त्या दुकानदाराला विचारणार..

"मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०२० आहे का?"
"हो आहे ना!"
"कसं दिलंत??"
"५० रुपये एका कॉपीचे.."
"तो पलिकडचा दुकानदार तर ४५ ला देतो की.."
"तो फुल्ल इंस्टॉलेशन नाही देत.."
"ओके ओके.. चल मला पाच सेट दे.. आणि हो, नीट कागदात बांधुन दे.."
lol

लगेच तो दुकानदार एका ड्रॉवर मधुन पाच सिड्या बाहेर काढतो,
अगदी वाणी स्टाईलनी त्या कागदात गुंडाळतो,
त्यावर दोरा बांधतो आणि आपल्या सुपुर्त करतो.

आपण ते पुडकं पिशवीत टाकतो आणि घराच्या रस्त्याला लागतो.

हे असं झालं तर कसलं कॉमेडी वाटेल ना??
wink bigsmile

१०१फक्त प्रौढांसाठी..

Comments

Anonymous Sunday, April 26, 2009 11:58:29 AM

Anonymous writes: nice

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies