Skip navigation.

कवडसा

कॉपी-राईटेड!

१२७

इतके दिवस भाजुन काढल्या नंतर निसर्गानं जरा दया दाखवलीच! :up:
आत्ता संध्याकाळ पर्यंत सगळं व्यवस्थीत, नेहेमीप्रमाणे होतं.. आणि बघता बघता हवाच बदलली!!:smile:

हवेतुन पावसाचा वास यायला लागला.. थोड्याच वेळात धुळीनी भरलेली एक वावटळ सुद्धा दाखल झाली की आसमंतात..!
आणि त्यासोबतच हळुहळु करत एक महाप्रचंड असा काळा ढग दाखल झालाय पुण्याच्या आकाशात. :eyes:
एरवी संध्याकाळच्या साडे सात वाजता सुद्धा दिसेल एवढा उजेड असतो, पण आत्ता मात्र ठार अंधार पडलाय.

हुर्रे!! पाऊस सुद्धा पडायला लागला की!!!! :yes:
या महाप्रचंड अशा ढगात विजा सुद्धा कडाडताहेत, चमकताहेत..
वारा तर बेफान आहेच.. पण पाऊस आणि गडगडाट सुद्धा मधुनच जोर दाखवतायत.

हवा बदलली ते एक बरंच झालं म्हणायचं.. नाहीतरी नुसतंच उकडायचं.. ही अशी हवा असली की कसं मस्त वाटतं ना?

...

...

थांबला पाऊस :frown:
थोडासाच पडला इकडे तर.. हे म्हणजे त्या ’लगान’ पिक्चर सारखंच झालं की.. बरं झालं मी गाणं नव्हतं म्हणायला घेतलेलं.
ढगच उरलेत फक्त आता..

माझ्या मित्रमंडळींच्या मुलाखतीएक उनाड दिवस...

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies

December 2009
S M T W T F S
November 2009January 2010
1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 31