कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

भरतचे ’आलु पराठे’

, , , ,

बि.सी.एस.च्या दुसऱ्या वर्षाला होतो तेव्हाचा किस्सा.

माझे आई-वडिल बाहेरगावी गेले होते. आणि याच संधीचा फायदा उठवायला आमची सगळी गॅंग माझ्या घरी पिक्चर बघायला जमली होती. त्यासाठी कॉलेजला दांडी मारलीच होती, ते काय सांगायला नकोच. smile तर, हा असा फक्कड प्लान असल्यानं आम्ही येतांनाच भरपुर सि.डी. आणल्या होत्या सोबत. एकामागुन एक पिक्चर बघण्याचा सपाटाच लावला होता.

थोड्यावेळानी मात्र आम्हाला सगळ्यांनाच भुक लागली. मी दिवसभर कॉलेजला असणार म्हणुन आईनं काहीच करुन ठेवलेलं नव्हतं घरात. त्यामुळं तर आमची अजुनच जास्ती पंचाईत झाली. काय करावं काही सुचत नव्हतं. मध्येच या भरतच्या डोक्यात आलं काहीतरी.. मला म्हणे, "प्रभास, घरात पोळीचं पीठ आणि बटाटे आहेत का?"
"हो, आहेत."
"काढ कणिक बाहेर, मी आलु पराठे बनवतो."
"येतात का तुला नक्की बनवता?"
"हो मग!"
म्हटलं, हा बाप्या एवढं आत्मविश्वासानी सांगतोय तर येत असतील.
भाऊ नी, कणिक भिजवली, ती मळली, त्याचबरोबर बटाटे उकडायला ठेवले. बटाटे उकडुन तयार होतायेत तोवर, साहेबांनी पराठे ’थापायला’ सुरुवात केली. ती ओली कणिक... पोळपाटाला चिटकत होती तशीच.. बघावं तर रावसाहेबांनी कणकेचा सगळा डब्बाच रिकामा केलेला! पराठे बनवतांना वापरायला म्हणुन कोरडी कणिकच उरली नव्हती!! bigsmile

ते बटाटे सुद्धा या पठ्ठ्यानं पुर्ण उकडु दिले नाहीत. तसेच बाहेर काढले, त्यांचे काप केले आणि अक्षरशः हातानी ’पेरले’ त्या कच्च्या पराठ्यांमध्ये!

बाप रे!!! yikes

डोंबल्याचे ’आलु पराठे’.. भरपुर शिव्या पडल्या भरतला.. नाही तर काय?

तरी नशिब, पंकज आमच्या सोबत होता. आणि नशिब अजुनच बलवत्तर की त्याला खिचडी अगदी व्यवस्थीत (आणि हुकमीपणे) करता येत होती.
शेवटी पंकजनी तांदळाची खिचडी लावली, आणि आम्ही सगळे त्यावर तुटुन पडलो..!
भरतचे पराठे होतेच सोबत.. लोणच्यासोबत खायला.. wink

निवडणुकीच्या निमित्तानं डोक्यात आलेली कल्पनाआला रे पाऊस आला!!

Comments

bharat banatebharatbanate Monday, May 18, 2009 5:09:21 AM

Are pan me tula lal mirchi magitali tar tu mala ..masala dilas...tya mule tar sagala ghotala zala na....smile bigsmile bigsmile.

Pan majja ali hoti.....our college days rocks...!!!

Prabhas Gupteprabhas Monday, May 18, 2009 5:19:44 AM

bigsmile

Tu lal mirchi mhatalyavar mi tula khari-khuri mirchi offer keli hoti, tar tuch mhanat hotas "hi nahi" mhanun..

mala kay mahit, tu 'tikhat' la 'lal mirchi' mhanato ahes mhanun!

ahi ho, parathya madhe tikhat kamich asate, halad jasti asate smile

anyways! cooking exerience was fantastic!!
mi tuzyakadunach inspiration ghetalay bigsmile

Anonymous Saturday, May 23, 2009 10:44:57 AM

Ashwini Rane writes: gharatale pith sampale mhanun nantar AAI changalich oradali asel ho na........

Prabhas Gupteprabhas Saturday, May 23, 2009 11:43:24 AM

Nahi.. mi sangitala tila amacha 'parakram'. smile

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies