कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

बंडु महाराजांची किर्ती .. एक पोवाडा

,

प्रस्तावना:
बंडु. माझ्या जवळच्या मित्रांपैकीच एक.
आम्ही बि.सी.एस.ला शेवटच्या वर्षाला होतो तेव्हा त्याची एक छोटीशी स्टोरी होती.
खुन्नसमुळं त्याची स्टोरी जास्ती पुढं नाही गेली. पण परिक्षेत बंडुनं शेरास-सव्वाशेर उत्तर देतं लढाई जिंकली.
त्याच्या याच पराक्रमाला सलाम म्हणुन हा लेख.
खरं तर हा लेख नाहीये. पोवाडा आहे.
ज्या वयात मी पोरींवर कविता करायला पाहिजे त्या वयात मी (कॉपी करुन) पोवाडा लिहीला आहे.
’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटातल्या पोवाड्याच्या धर्तीवर हा पोवाडा बनवलाय.
तुम्ही तो पोवाडा ऐकला असेल तर तीच चाल डोक्यात ठेवुन हा पोवाडा वाचा.. म्हणजे तुम्हाला मजा येईल. smile



महाराजांची..
बंडु महाराजांची किर्ती बेफाम होती..!
महाराजांची किर्ती बेफाम, भल्याभल्यांना फुटला घाम!
याला कोण घालीयेला कॉलेजी, पुसती बंडी बेगम..!

बंडी.. म्हणजे महाराजांच्याच कॉलेजमधली एक राणी बरं का!
नजरेत तिच्या अंगार, वर्ग झाला गप्पगार!
कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार!!

इतकयात बंडीच उठली, म्हणाली "मी हरवेन बंडुला.." knight
अन तिनं विडा उचलला..
नांव तिचं बंडी बेगम...
नांव तिचं बंडी बेगम...
जणु जिती-जागती सैतान..
म्हणाली दंड थोपटुन, बंडुला टाकते हरवुन!! devil

व्वा!! व्वा!! व्वा!!!

कौतुक झालं वर्गात.. बंडी निघाली मोठ्या गुर्मीत..
थिअरी पुस्तकं, प्रॅक्टीकलं, तीची तयारी बक्कळ..!
डोकी दहा बंडुंची अक्कल.. पाहणारा कापे चळचळ.. no

वाटेत भेटेल त्या विषयाला हरवीत, ठेचीत बंडी निघाली.
प्रॅक्टीकल्स लुटली, पेपर्स उध्वस्त केली, ओरल परिक्षा सुद्धा लुटली!!
कोण? कोण रोखणार हे वादळ??
आता बंडुचं काही खरं नाही...
इकडं मॅथ्स, तिकडं टि.सी.एस., पलीकडं सिस-प्रो.. bigeyes

जो तो हेच बोलु लागला..
बंडुचे मार्क्स मुठभर.. बंडीला कसा थोपणार??
काय लढवावा हुन्नर? चिंतेत गुप्ते आणि बच्छाव..

पण कावकाव.. कावकाव काय म्हणाले?
बंडु केवळ आमचा मित्र नाही, अवघ्या कॉलेज-जनांचा स्वाभिमान आहे.
मार्क्स कमी मिळाले तरी बेहत्तर, पण भ्याडपणे परिक्षा न देऊन कॉम्प्युटर सायन्सचा मान गमावता कामा नये. smile

अशा कावळ्याचा तो बंडा...sssss
अशा कावळ्याचा तो बंडा...
गनिमाला कसा ठेचावा?
डोक्यात गनिमी कावा..
अंताक्षरीचा धाडला सांगावा!
बोट क्लबवर..
बोट क्लबवर ’ट्रॅडिशनल डे’ला आमने-सामने अंताक्षरीचा सांगावा बंडीनं हसत हसत कबुल केला!
दिवस ठरला..

अन ठरल्याप्रमाणं, बोट क्लबच्या कट्टयावर बंडी..
आ ssss आssss आssss
बोट क्लबच्या कट्टयावर बंडी.. हे..
बोट क्लबच्या कट्टयावर बंडी..
बोट क्लबच्या कट्टयावर बंडी..
आली गप-गुमान
नाही तिला जाण बंडुराजाच्या करामतीची..
बंडुराजाच्या करामतीची..
अन तिस नाही जाणिव लॉजिकची..
अन करील काय कल्पना युक्तीची.. हो जी जी जी...!
बंडीच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार कट्टा निवडला होता.

भेटीसाठी छान निवडला,
भेटीसाठी छान निवडला,
शानदार त्या कट्टयाला..
शानदार त्या कट्टयाला..

अन अशा या कट्टयावर..
बंडी हलत डुलत आली..
बंडी हलत डुलत आली!
सगळ्या माहाकाया तिच्या सोबतीला..
सगळ्या माहाकाया तिच्या सोबतीला..
बंडुच्या संग बनाट्या ..
बंडुच्या संग बनाट्या ..
बरं का, बनाटे नावाचा कार्टा होता..
अहो म्हणतात ना.. होता बनाट्या म्हणुन वाचला बंड्या!! up
बंडुच्या संग बनाट्या ..
बंडुच्या संग बनाट्या ..

बंडुला पाहुन..
बंडुला पाहुन बंडी म्हणते कशी
"हा हा हा!! ये, ये बंड्या ये
आम्हाला अंताक्षरी खेळव.."
बंडी हाक मारिते हसरी
बंडी हाक मारिते हसरी
रोखुन नजरा गहिरी
जिरहा जिररजी जी जी
जिरहा जिररजी जी जी
जिरहा जिररजी जी जी जी

आ हा हा! पण आपला बंडु पण काय कच्चापुरचा चेला नव्हता!
बंडु थोर बात त्याची न्यारी
बंडु थोर बात त्याची न्यारी
चाल हत्तीची सावध भारी
जिरहा जिररजी जी जी
जिरहा जिररजी जी जी
जिरहा जिररजी जी जी जी...

बंडीनं अंताक्षरी सुरु केली आणि दगा केला!! no
बंडी गाई मनचीच गाणी..
बंडी गाई मनचीच गाणी..
चुकीच्याच भेंड्या तिनं लावल्या
चुकीच्याच भेंड्या तिनं लावल्या
इकडं चढे बंडुचा पारा
इकडं चढे बंडुचा पारा
पाठ होती गाणी त्याला..
पाठ होती गाणी त्याला..

बंडीचा डाव फुका गेला.. बंडी गडबडली..
इतक्यात बंड्या बरोबर गाणी लागला गायला..
बरोबर गाणी लागला गायला..
हिंदी गाण्यांचा मारा केला
हिंदी गाण्यांचा मारा केला

गप्पगार केलं बंडीला..
गप्पगार केलं बंडीला..
बंडीचा चेहरा पडला की हो जी जी जी
बंडीचा चेहरा पडला की हो जी जी जी
बंडीचा चेहरा पडला की हो जी जी जी bigsmile

परिक्षेचे युद्ध जाहले!! आsss आsss आsss..
परिक्षेचे युद्ध जाहले..
परिक्षेचे युद्ध जाहले..
मार्क्स सांडले..
वाद सारे गेले..
पावन केला गोदेचा घाट
पावन केला गोदेचा घाट
पावन केला गोदेचा घाट
अन लावली बंडीची हो वाट..
अन लावली बंडीची हो वाट..
अन लावली बंडीची हो वाट..
अन कॉम्प्युटर सायन्सचा मांडला थाट जी जी..
अन कॉम्प्युटर सायन्सचा मांडला थाट जी जी..
अन कॉम्प्युटर सायन्सचा मांडला थाट जी जी जी जी जी.. happy



ता.क.
पोवाड्यातल्या व्यक्तीरेखांचे काही खुलासे असे:
बंडु = पोवाड्याचा ’हिरो’.
बंडी = पोवाड्याची ’हिरॉईन’+’व्हिलन’.
गुप्ते, बच्छाव, बनाटे = बंडु महाराजांचे जवळचे सहकारी. त्यांतला गुप्ते मीच!
कावकाव = कावळे = बंडु महाराजांचा जिवश्च-कंठश्च मित्र - कावळे त्याचं आडनांव.

१४३कंटाळा आलाय...

Comments

Anonymous Saturday, May 23, 2009 10:12:33 AM

Anonymous writes: thnx. I remember my days

Anonymous Saturday, May 23, 2009 10:13:58 AM

Anonymous writes: tumcha powada kadhi lihinar. amhi tyachya pratikshet ahot.

Anonymous Saturday, May 23, 2009 10:25:40 AM

Amol k writes: good Bandu maharajanchi kirti far mothi

Anonymous Saturday, May 23, 2009 10:39:33 AM

Ashwini Rane writes: POVADA agadi zakkas aahe!!!!!!!!!! kasa kai re tula suchala??????????????

Anonymous Friday, January 22, 2010 3:46:38 AM

सिद्धार्थ writes: वा वा शाहीर गुप्ते, आज आमच्याकडे सत्ता असती तर आपणास दोन गावे तरी नक्की इनाम देऊ केली असती.

Anonymous Friday, January 22, 2010 4:53:58 AM

Pankaj writes: जबऱ्या आहे राव... किर्ती एकदमच बेफाम. अगदी मोठ्या आवाजात पोवाड्याच्या चालीत वाचलंय मी.

Prabhas Gupteprabhas Friday, January 22, 2010 6:47:53 AM

@ सिद्धार्थ
एवढे औदार्य दाखविल्याबद्दल धन्यवाद! wink bigsmile

Prabhas Gupteprabhas Friday, January 22, 2010 6:51:06 AM

@ पंकज
lol मला आशा आहे, तुला मजा आली असेल वाचतांना. smile

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies