कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

माझी वेबसाईट!

, ,

आजपासुन माझी स्वतःची वेबसाईट सुरु झालीये!! up www.prabhasgupte.com असा पत्ता आहे.

कालच मी वेब सर्वर वर जागा विकत घेतली, डोमेन-नेमसुद्धा नोंदवलं आणि काल रात्रीतच संपुर्ण वेबसाईट पुर्ण केलीये. मग सर्वरवर अपलोड करुन चाचणी घेतली, कुठे काही गडबड नाहीये ना याची.

हि वेबसाईट सुरु करण्यामागे बरेच हेतु आहेत. या ब्लॉगवरुन माझं अस्तित्व तसं आहेच इंटरनेट वर, पण एक व्यावसायिक अस्तित्वसुद्धा आता तयार झालंय या साईटच्या रुपानं. शिवाय माझ्या कामाची ओळख तयार व्हावी, व्यावसायिक संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी सुद्धा हि साईट कामी यावी अशी माझी अपेक्षा आहे. आत्ता ही साईट अगदी प्राथमिक स्वरुपाची माहीती देते आहे माझ्याबद्दल. पण लवकरच ती माझ्या कामाबद्दल सुद्धा माहिती द्यायला सुरुवात करेल. माझे काही ऑन-लाईन प्रोजेक्ट्ससुद्धा मी तिथं लावणार आहे, जेणेकरुन भेट देणाऱ्यांना अगदी व्यवस्थीत कल्पना येईल मी नक्की काय, आणि कसं काम करतो याची. smile

अवश्य भेट द्या, आणि तुमचं काय मत आहे ते सुद्धा कळवा! smile

कंटाळा आलाय...हुर्रे!! ३०००० वाचक पुर्ण झाले!!! :)

Comments

Anonymous Thursday, May 28, 2009 6:43:51 PM

Ritulika writes: Hi just checked out your site. Its very nice. I like the layout and presentation. sahi ahe...job karun freelancing karayala time kasa kaay milato!! Lage raho Prabhasbhai...:)

Prabhas Gupteprabhas Friday, May 29, 2009 2:28:20 AM

Hi Ritulika, Thanks for visiting my site!
Aga, vel kadhala ki milato barobar smile

Tasa ajun barich update hoil ti site, pan sadhya tari evadhach.

Anonymous Wednesday, June 3, 2009 8:11:05 AM

priti writes: hi prabhash ,,,,,,,,,chan karykram hati ghetale aahe ,,kamat vel kadhun kahitri vegalec ,,,,khupac chan,,,tumhi kadhalele photo pahile jase diveaagar,,,,pan diveaagar far sundar aahe ,,,,ajun chan photo kadhata aale asate ,,,pan chan n thnx aamache kokan gav pahayala milale

Prabhas Gupteprabhas Wednesday, June 3, 2009 8:29:11 AM

Hi Priti,

ho, ajun chhan photo kadhata ale asate.. pan mi ekdum ch kachcha limbu aahe photography madhe. p

Anonymous Saturday, June 6, 2009 6:43:46 AM

Ashwini Rane writes: Tuzya website baddal tula HARDIK SHUBHECHCHAAAAAAA!!!!!!!!!!!! SHUBHECHCHA KHOOOOOP USHIRA DETE AAHE HO NA........

Anonymous Friday, June 12, 2009 6:02:24 PM

भुंगा writes: नमस्कार प्रभास! ब-याच दिवसांत तुझ्या ब्लय्गला भेट देणं झालं नाही.... आज मुहुर्त लागला म्हण! असो, तुझ्या काही पोस्ट वाचल्या.. नेहमी प्रमाणेच मस्त लिहिल्यात - सांगणे नको! तुझ्या नविन साईटलाही भेट दिली.. आता तू स्वतः PHP प्रोग्रामर आहेस.. वर्डप्रेस का इन्स्टाल करत नाहीस.. एखादी चांगली थीम बघ... नाहीतर कस्टमाइज कर, स्वतः...म्हणजे कसं साइटला एक लुक येइल! अर्थात तुझा ब्लौगही तिकडे मुव्ह कर आणि या ब्लौगवर तशी माहिती दे.. म्हणजे तुझ्या नविन साइटवर लोकांची ये-जा सुरु होइल! बाकी जास्त सांगणे नको... लिहित रहा! शुभेच्छा! भुंगा http://bhunga.blogspot.com

Prabhas Gupteprabhas Saturday, June 13, 2009 2:40:22 AM

नमस्कार भुंगा! smile तुम्हाला पुन्हा पाहुन खुप आनंद झाला.

साईटबद्दल तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मला अनायसे, स्वतःचीच जागा असल्यानं प्रयोग करायला वाव मिळाला आहे. आणि त्यामुळंच मी माझ्याच साईटवर भरमसाट प्रयोग करत सुटलोय. तुम्ही जो ’लुक’ पाहिलात त्याच्या आधी मी दोन वेगवेगळ्या थिम्स लावल्या होत्या. त्या बदलण्यामागे ’प्रयोग’ हाच एकमेव हेतु आहे. मी आत्ताची साईट ही एकाच पाना़ची ठेवली आहे. गुगल सर्च इंजिनवर या कमीत कमी वजनाचा नक्कीच फायदा होतो. आणि झाला सुद्धा आहे! तुम्ही जर गुगल मध्ये ’prabhas gupte' असं शोधलंत तर माझी वेबसाईट पहिल्याच क्रमांकावर येतेय. एकच पान, आणि लोड व्हायला लागणारा कमीत कमी वेळ असा फायदा मिळतो.

माझे प्रयोग अजुनही चालुच आहेत. आणि त्यामुळं अधुन-मधुन साईटचा चेहरा-मोहरा बदलणारच आहे. p अगदी सगळं फाइनलाईज झालं की मग इथं तसं जाहिर करेनच!

ब्लॉग मात्र मी इथंच ठेवणार आहे. smile तिथे मी टेक्निकल ब्लॉग सुरु करतोय. आणि हो, माझे काही छान छान प्रोजेक्ट्ससुद्धा येत आहेत तिथेच..

तेव्हा बास्स, अजुन थोडा वेळ ’वेटा आणि वॉचा’ bigsmile

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies