१७०
Friday, 19. June 2009, 06:25:57
ऑफिशियली, पावसाळा सुरु होऊन महिना होत आलाय.. काही दिवस बाकी आहेत तसे, नाहीच असं नाही.
पण पावसाचा काही पत्ता नाहीये.
आयला, बंगालच्या उपसागरात ते ऐला चक्रीवादळ उगवलं आणि मान्सुनची वाटचालच रोखली त्यानं.
काल वेधशाळेनं "ढगांच्या गडगडाटासह शहर व परिसरात पाऊस पडेल" असा अंदाज दिला होता, तो अंदाजच राहिला.
ते काळे ढग आले, येतच राहिले आणि चुपचाप, गुपचुप निघुन सुद्धा गेले!! नो पाऊस, नथिंग.
आता शेतकरीच काय, सगळेच लोक पावसाची वाट पाहत आहेत.
माझ्या आठवणीप्रमाणे, २००५ साली आलेला पाऊसच धो-धो कोसळला होता. मुंबईला नाही का, मोठाच जलप्रलय झाला होता! त्यानंतर लक्षणिय असा पाऊस नाहीच झालाय कधी. अगदी तेवढा नकोय आपल्याला, पण सरासरी तरी हवा ना?
पाऊस झाला नाही तर शेती होणार नाही..
शेती नाही तर धान्य नाही..
धान्य नाही तर लोक खाणार काय?

How to use Quote function: