कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

१९९

, ,

आजकाल मी पुस्तकं वाचण्याचा सपाटाच लावलाय! मध्यंतरी ’सामरी’ ही भयकथा वाचुन झाली, पाठोपाठ ’कोमा’ ही गुढकथा. आणि नुकतंच, म्हणजे परवाच मी ’बिंदु सरोवर’ नावाची कादंबरी संपवली. राजेंद्र खेर यांची आहे. या कादंबरीच्या पाठीमागच्या पृष्ठावर लिहील्याप्रमाणंच ही ’वास्तवाकडुन अद्भुततेकडे नेणारी आणि प्रत्येक क्षणी उत्कंठा वाढवणारी" अशी सर्वस्वी अनोखी कादंबरी आहे ही!

भविष्यातल्या काळातली, म्हणजे २०२५ सालची कथा आहे ती. २०२३ साली चीननं तिबेटवर आक्रमण केलं आणि त्यातच त्यांच्या हाती एक संस्कृत हस्तलिखित सापडलं. जेव्हा त्यानी हस्तलिखिताचं भाषांतर करुन घेतलं तेव्हा त्यांना भारतातल्या एका गुढ ठिकाणच्या एका गुढ वस्तुबद्दल समजलं! अशी वस्तु जिच्या सहाय्यानं संपुर्ण विश्वाची रहस्य उघडतील आणि माणुस संपुर्ण विश्वावर ताबा मिळवु शकेल!! चिनी लोकांना ’त्या’ वस्तुचा ठावठिकाणा कळतो आणि सुरु होतो एक जिवघेणा पाठलाग!!

काय आहे हे बिंदु सरोवर? कोणतं रहस्य दडलं आहे त्यात?? हे माहित करायला मात्र कादंबरीचं पान अन पान वाचावं लागेल. smile

कवडसा आता ’ट्विटर’वर सुद्धा!!वेध सुर्यग्रहणाचे!

Comments

Anonymous Monday, July 27, 2009 5:55:53 AM

भुंगा writes: प्रभास, आजच "बिंदुसरोवर" आणलयं.. तुझं वाचुन झालं असेलच? असेच पुस्तकांची माहिती देत जा.. ;)

Prabhas Gupteprabhas Monday, July 27, 2009 8:53:04 AM

भुंगा,

माझं कधीच झालंय वाचुन! मला आशा आहे की तुम्हाला आवडेल. काही प्रसंग तर अगदीच छान आहेत त्यातले.

Anonymous Wednesday, July 29, 2009 8:30:18 AM

jiva writes: तुझं वाचुन झालं असेलच? असेच पुस्तकांची माहिती देत जा..????????? jiva_patil@yahoo.co.in

Anonymous Saturday, June 18, 2011 11:06:53 AM

Kanchan Karai writes: आजच सकाळी आली ही कादंबरी. पन्नास एक पानं वाचून झालीत. पण खूप उत्कंठावर्धक आहे. आणि मुख्य म्हणजे एक वेगळाच विषय. लेखनशैली इतकी सुंदर की मनासमोर आपोआप प्रसंगचित्रं तयार होतात.

Anonymous Saturday, June 25, 2011 10:37:22 AM

mahesh writes: haa lakh wchun malana khupach hasa alla karn jani ha lakh lihila taini matra khupach vichir purvak lihala .aapl man he kasa akashat firnari vriasarkh asta dusri oshti cha vichar kala tar

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies