कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

वेध सुर्यग्रहणाचे!

, ,

उद्या - दि. २२ जुलै २००९ रोजी खग्रास सुर्यग्रहण होतंय. भारतातुन सुद्धा खग्रास अवस्था दिसणार आहे. मुळात, या सुर्यग्रहणाची सुरुवातच भारतापासुन होतेय यंदा! मी तर खुपच उत्साहीत झालेलो आहे हे ग्रहण पाहण्यासाठी. यंदाचं ग्रहण हे "ग्रस्तोदित ग्रहण" आहे. म्हणजे, सुर्य उगवतांनाच त्याला ग्रहण लागलेलं असणार आहे. जरी पावसाळ्याचे दिवस असले, आणि पाऊसही पडत असला तरी मी मात्र जय्यत तयारी करत आहे. मी काही आशा सोडलेली नाही. यामागचं कारण सुद्धा तसंच आहे ना! यानंतरचं, भारतातुन दिसणारं खग्रास सुर्यग्रहण आहे तब्बल २५ वर्षांनंतर!! आणि ते ही दिसेल ते काश्मीरच्या उत्तर भागातुन. आणि त्याच्याही पुढचं खग्रास सुर्यग्रहण भारतातुन दिसेल ते जवळ जवळ सव्वाशे वर्षांनंतरच. त्यामुळं, खऱ्या अर्थानं, भारतातल्या बहुतेक सगळ्यांचंच हे अखेरचं खग्रास सुर्यग्रहण आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा हे ग्रहण बघण्याचा इवलास्सा चान्स सुद्धा चुकवु नका! ढग असले तरी आशा सोडु नका!! न जाणो, आपल्या नशिबानं सुर्य दर्शन देईल सुद्धा!

तुम्हाला माहितीये? या ग्रहणात चंद्राची सावली पृथ्वीवरुन तब्बल १५ हजार १५० कि.मी. अंतर कापणार आहे! आणि सुरुवातीला या सावलीचा वेग दर सेकंदाला ९ कि.मी. एवढा असणार आहे! नंतर जस-जशी ही सावली पुढे सरकेल, तस-तसा हा वेग मात्र कमी होत जाईल.

महाराष्ट्रातल्या काही प्रमुख शहरांमधुन सुर्य उगवण्याच्या वेळा आणि ग्रहणाचे प्रमाण मी इथं खाली देत आहे.
पुणे - स. ६.०९ वा. - ९३%
मुंबई - स. ६.१२ वा. - ९६%
नाशिक - स. ६.०६ वा. - ९८%
नागपुर - स. ५.४३ वा. - ९६%
कोल्हापुर - स. ६.१० वा. - ८७%

धुळे, नंदुरबार इथल्या सुर्योदयाच्या वेळा मला माहीत नाहीयेत, पण तिथुन १००% खग्रास सुर्यग्रहण दिसणार आहे.

ता.क. आत्ताच बाहेर पुन्हा एकदा जोराचा पाऊस सुरु झालाय. काय पडायचा तो आत्ताच पडुन घे म्हणाव.. संध्याकाळ ते उद्या ग्रहण संपेपर्यंत तु आणि तुझे ढग सुट्टी घे रे बाबा. आणि ग्रहण संपलं की लगेच ये मात्र!

१९९आज आहे १०वा कारगील विजय दिवस!

Comments

Anonymous Wednesday, July 22, 2009 4:48:53 PM

Ritulika writes: Did you get to see it?

Prabhas Gupteprabhas Thursday, July 23, 2009 3:41:01 AM

नाही ना! sad ढगाळ हवा आणि पावसामुळं काहीच नाही बघायला मिळालं.. cry

Anonymous Sunday, July 26, 2009 6:01:04 AM

nikhil jadhav writes: wa chan lihiles nice work

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies