निलकेणींची युनिक आय.डी.सिस्टम!
Thursday, 6. August 2009, 09:34:12
नंदन निलकेणींनी सुचवलेली, प्रत्येक भारतीयासाठीची युनिक आय.डी. सिस्टम अस्तित्वात आली तर कसा प्रसंग येऊ शकतो बघा.
पुण्यातल्या, बालगंधर्व समोरच्या ’पिझ्झा हट’मध्ये फोन वाजतो.
"पिझ्झा हट मध्ये कॉल केल्याबद्दल धन्यवाद. मी आपली काय मदत करु शकते?"
"मला ऑर्डर नोंदवायची होती."
"मला तुमचा युनिक आय.डी. नंबर मिळु शकतो का सर?"
"थांबा हं.. हा.. नंबर आहे ८८९८६१३५६१०२०४९९९८-४५-५४६१०"
"नंबर दिल्याबद्दल धन्यवाद सर. तर तुम्ही आहात मि. पंकज सिंग. तुम्ही राहता १७, जल वायु इथं, आणि तुमचं ऑफिस २०३, शारदा सेंटर इथं आहे. तुमच्या घरचा फोन नंबर २६६७ ८८९३ आहे, ऑफिसमधला नंबर २५०७ ६६६६ आहे आणि मोबाईल नंबर ९८९०० ८०८२५ आहे. आजच सकाळी आपण लोहगांव विमानतळावर उतरलात! वेलकम बॅक, सर!! तर, आत्ता सांगितलेल्या पैकी कोणत्या नंबरवरुन आपण कॉल केला आहे सर?"
"घरच्या! पण माझे नंबर्स तुम्हाला कसे कळाले?"
"आम्ही सेंट्रल सर्वरशी जोडलेलो आहोत सर.."
"मला सि-फुड पिझ्झा ऑर्डर करायचा होता.."
"सि-फुड पिझ्झा?? हि चांगली आयडिया नाहीये सर."
"का?"
"तुमच्या मेडिकल रेकॉर्ड्स नुसार तुम्हाला हाय-ब्लड प्रेशरचा त्रास आहे सर, आणि तुमची कोलेस्टेरॉल लेव्हल सुद्धा जास्ती आहे सर."
"काय??? मग तुम्ही काय सुचवाल??"
"आमचा लो-फॅट पिझ्झा ट्राय करा सर, तुम्हाला आवडेल!"
"ओके, मी मान्य करतो. मला ३ फॅमिली पॅक द्या. किती किंमत होते त्याची?"
"तुमच्या ५ जणांच्या फॅमिलीसाठी हे पुरेसे होईल सर. एकुण ५०० रुपये सर."
"मी क्रेडीट कार्डनी पैसे भरु शकतो ना?"
"नाही सर, तुम्हाला कॅशच भरावी लागेल. तुमचं क्रेडीट कार्ड आधीच लिमीटच्या वर वापरलेलं आहे. शिवाय तुम्ही अजुन बॅंकेकडे रु. २३०००.७५ चं पेमेंट केलेलं नाहीये."
"मग तुमचा माणुस येण्याआधी मला जवळच्या ए.टी.एम.ला जावं लागेल."
"ते सुद्धा उपयोगाचं नाही सर.. तुम्ही दिवसाचं लिमीट मगाशीच पुणे सेंट्रलजवळच्या ए.टी.एम.मधुन क्रॉस केलंय."
"असो.. तुम्ही पिझ्झा पाठवा.. मी पैसे तयार ठेवतो. किती वेळ लागेल?"
"साधारण ४५ मिनिटं लागतील सर. पण तुम्हाला त्या आधीच पाहिजे असतील तर तुम्ही तुमच्या नॅनो मधुन येऊ शकता."
"काय??"
"आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार, सर, तुमच्या कडे निळ्या रंगाची नॅनो कार आहे. रजिस्ट्रेशन नंबर एम.एच. १२ झेड-टी २३०९."
"?????"
"अजुन काही सर??"
"नाही बाकी काही नाही.. बाय द वे! जाहिरातीत सांगितल्यानुसार तुम्ही मला कोकच्या ३ बाटल्या नाही देणार?"
"नाही सर. एरवी आम्ही देतो, पण तुमच्या रेकॉर्डनुसार तुम्हाला डायबेटीस सुद्धा आहे!"
"#$$^%&$@$%^"
"तुमची भाषा सांभाळा सर.. आठवतंय का, १५ जुलै २०१० रोजी दुपारी १२ वाजता पोलिसाशी अपशब्द बोलल्याबद्दल तुम्हाला एक दिवसाची अटक आणि दंड झाला होता ते??"
मला आलेल्या इंग्रजी ई-मेल चे भाषांतर. हि सुचना उशिरा लावल्याबद्दल एक-सदस्यीय मंडळ दिलगीर आहे. :)


Anonymous # 6. August 2009, 16:17
mast lihil aahe
Anonymous # 6. August 2009, 19:50
Basically this would be like SSN and it is highly secured. Who told you that it will be used while ordering pizza or that kind of stuff?
Prabhas Gupte # 7. August 2009, 04:16
Yes, it will resemble SSN concept. I have just used it to create humor. Of course, no pizza center will have access to the system!
Anonymous # 7. August 2009, 05:11
छान!
काही दिवसांपुर्वी मी ही याबद्दल लिहायचा प्रयत्न केला होता
http://bhunga.blogspot.com/2009/07/blog-post_22.html
Prabhas Gupte # 7. August 2009, 05:18
tumhi aani mi ekach email che bhashantar kele!
Anonymous # 26. September 2009, 16:25
AWESOME