कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

ऑपरेशन पेन-फाईंडर

मी काल पासुन एका आगळ्या-वेगळ्या ’मिशन’वर आहे.. "ऑपरेशन पेनफाईंडर"!

अरे काय.. गुढ तिढा आहे नुसता..! झालं काय की, मी काल घरातल्याच एका खोलीत काही लिखाण-काम करत बसलो होतो. एका बारक्या, निळ्या रंगाच्या आणि निळ्याच शाईच्या बॉलपेननं लिहीत होतो मी. थोड्यावेळानं सहज, बदल म्हणुन त्या खोलीतुन दुसऱ्या खोलीत गेलो. पण या खोलीतुन दुसरीमध्ये जाण्यात तो पेन अक्षरशः गायब झाला!

आधी मला वाटलं, आपण आधीच्याच खोलीत सोडुन आलो असु त्याला. म्हणुन त्या खोलीचा ’चप्प-चप्पा छान मारा’ (म्ह्णजे, कोपरा-कोपरा छानपणे शोधला). पण काही उपयोग नाही. म्हणुन मग ज्या खोलीत गेलो, त्या खोलीभर सुद्धा शोधला त्या पेनला. पण तिकडंही नाही!! आयला हा गेला कुठे??

तेव्हापासुन मी घरातल्या तिनही खोल्या परत-परत शोधल्यात, अजुन सापडला नाहीये.

हा.. तसं नाही म्हणायला मुळ जागी पेनचं टोपण मात्र मिळालं.. पेन मात्र अजुन बेपत्ताच आहे. cry

ता.क. पेन सापडला!! दरवाज्याच्या मागच्या खाचेत गेला होता. कसा गेला तिथं काय माहित..! पण सापडला. smile

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!नसतेस ऑनलाईन तु जेव्हा…

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies