कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

२७५

, ,

संध्याकाळी मी बाहेर गेलो होतो. परत येतांना जंगली महाराज रोडवर मॅकडोनाल्ड्सच्या समोर थांबावं लागलं पी.एम.पी. बस मुळं. सहज माझं लक्ष बस स्टॉपवरच्या लोकांकडं गेलं. आणि मला जे दिसलं ते खरंच मनाला दिलासा देणारं असंच दृष्य होतं!!

एक छोटी मुलगी - चांगल्या सुशिक्षीत आणि श्रीमंत घरातली - रस्त्यावर पैसे मागत फिरणाऱ्या दुसऱ्या एका मुलीसोबत सागर-गोट्या खेळत होती!! मी पटकन गाडी बाजुला घेतली आणि बघायला लागलो त्या दोघी काय करत आहेत ते. पहिल्या एक-दोन मिनीटांत तिनं त्या रस्त्यावरच्या मुलीकडुन शिकुन घेतलं "सागर-गोटे" कसं खेळायचं ते. आणि लागल्या दोघी खेळायला. दोघींच्या चेह्ऱ्यांवर आनंद स्पष्टपणे दिसत होता. आणि दोघीही तेवढ्याच तल्लीनतेनं तो खेळ खेळत होत्या. मला इतकं कौतुक वाटलं त्या छोटीचं म्हणुन सांगु!!

बघा ना, एरवी आपण अगदी नाकं न मुरडता आणि तोंड वेडं-वाकडं न करता जरी चालत असलो, तरी समोरुन कोणी भिकारी आला तर आपण किमान रस्त्याची दिशा तरी बदलतोच. अनेक जण आपल्याकडं पैसे मागतात, पण आपण कधी स्पष्ट नकार देतो, त्यांना हाकलुन देतो किंवा ढुंकून बघत सुद्धा नाही कधी कधी. पण या छोटीनं.. हिनं तर भर रस्त्यात बस-स्टॉपवर फतकल मारुन बसत ’ती’च्याशी खेळण्याचं धारिष्ट्य दाखवलं! शेवटी खेळात कोण गरीब आणि कोण श्रीमंत?

पण मग,
खरं गरीब कोण? ’ती’ की आपण??
खरं श्रीमंत कोण? हि मुलगी की आपण??

बहुतेक खरं उत्तर आत्ता कुठं सापडलंय!

नसतेस ऑनलाईन तु जेव्हा…तुमच्याकडे, तुमच्या आसपास जुनी सायकल आहे का?

Comments

Anonymous Wednesday, October 7, 2009 3:26:55 PM

Prakash B Pimpale writes: खूप छान अनुभव! माणुसकी आणि या सार्या गोष्टी जस वय वाढेल, जितक जास्त कालायाल लागेल तितक्या कमी होतात. माणूस मोठा होतो म्हणजे श्रीमंत होतो की आयुष्याच्या खर्या अर्थाने गरीब होतो हाच मोठा प्रश्न आहे.

Anonymous Friday, October 9, 2009 12:51:13 PM

kanif writes: good blog

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies