यंदाचं "दिवाळी स्पेशल"...
Wednesday, October 14, 2009 3:58:45 PM

तुम्हाला आठवतं मी मागच्या वर्षी माझ्या खास मित्र-मंडळींच्या मुलाखती घेतल्या होत्या, "दिवाळी स्पेशल" म्हणुन..?
या वर्षीसुद्धा अशाच मुलाखती घ्यायचा माझा विचार आहे. आणि हो! यंदा मात्र मी बऱ्यापैकी ओळखीच्या झालेल्या ३ विशेष लोकांची यासाठी निवड केली आहे.
ते तिघं कोण ते तुम्हाला कळेलंच लवकर.. म्हणजे जेव्हा त्यांच्या मुलाखती इथं प्रसिद्ध करेन तेव्हाच! तो पर्यंत मात्र तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल, आणि तुम्ही तो धराल (तो = धीर) याची मला खात्री आहेच! (न धरुन करणार काय तुम्ही?? मी इथं लिहील्याशिवाय थोडीच कळणार आहे तुम्हाला?)कदाचित तुम्ही या मंडळींना ओळखत असालही.. किंवा नसालही ओळखत!
पण ओळखायला लागालच मग!! मागच्या वेळेसप्रमाणेच या वेळी सुद्धा या मुलाखती विना-एडीटींग असणार आहेत, आणि या वेळी कदाचित त्यांचा फोटो सुद्धा असेल! मी तर एकदम उतावीळ झालोय त्यांच्या मुलाखती घ्यायला. त्यांतल्या एकाला तर मी प्रत्यक्ष भेटणारच आहे. अन्य दोघांना कामाच्या व्यग्रतेतुन वेळ किती मिळतो त्यावर अवलंबुन आहे. किंवा मग मागच्या वेळीप्रमाणे यांना ई-मेलने प्रश्न पाठवेन.

तेव्हा, वाट पाहत रहा, पुढच्या आठवड्यात कधीपण या मुलाखती प्रसिद्ध होतील.
[मला कल्पना आहे की माझा ब्लॉग काय एवढा पण भारी नाहीये, पण हा आपला माझा एक प्रयत्न आहे.
लोकं जोडण्याचं वेड लागलंय ना मला आजकाल!]
How to use Quote function: