कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

’फायरवायर शो’ची अप्रतिम आतषबाजी

,

काल संध्याकाळी पुण्यात ’फायरवायर शो’ हा आतषबाजीचा कार्यक्रम झाला. ’सकाळ’ पेपर्सतर्फे खास दिवाळीनिमित्त याचं आयोजन करण्यात आलं होतं. आय.पी.एल., राष्ट्रकुल युवा स्पर्धा यांच्यात ज्यांनी आतषबाजी केली, त्यांचाच हा कारनामा होता.

संध्याकाळी सात नंतर ही आतषबाजी होणार असं जाहीर करण्यात आलं होतं. ठिकाण होतं डेक्कन बस स्टॉपमागचं मैदान. मी सात वाजता तिथं पोहोचलो तर गाडगीळ पुल (Z ब्रिज), भिडे पुल, लकडी पुल, नदीपात्रातले रस्ते, बालगंधर्व पुल हे सगळेच गर्दीनं खचाखच भरलेले. नशिबानं आम्हाला गाडगीळ पुलावर ऐन मोक्याची जागा मिळाली. साडे-सात वाजता आतषबाजी सुरु झाली, आणि वेगवेगळ्या रंगांची उधळण, पाहणाऱ्यांच्या तोंडुन "वाह..!","आहा!!","वॉव्व..!!" असे उद्गार, शिट्ट्या यांची सुद्धा उधळण सुरु झाली.

केवळ २० मिनिटे ही आतषबाजी सुरु होती. आणि जेव्हा संपली तेव्हा झाला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट!! smile

मी याचे काही फोटो काढले आहेत आणि ते इथं लावले आहेत. जरुर बघा.

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया!एक गोष्ट रामाची...

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies