टॅगा-टॅगी (माझी सुद्धा)
2009年12月26日土曜日7:04:23

(प्रश्न इंग्रजीमधुन आहेत, पण उत्तरं मात्रं मी मराठीमधुनच लिहीली आहेत.)
1.Where is your cell phone?
शेजारच्याच टेबलवर. आमच्या इथं फक्त याच टेबलवर नीट रेंज मिळते. त्यामुळं तो बहुतांशी तिथंच असतो.
2.Your hair?
मस्त काळेभोर आहेत तसे. पण कधी कधी तेल लावलेले नसले तर भुरकट दिसतात.

3.Your mother?
गृहीणी आहे. हीचा स्वयंपाक नेहेमीच झक्कास बनतो. आणि घाई-घाईत केला असेल तर उत्तमच!! (त्यामुळे विशेष प्रसंगी स्वयंपाक करतांना मी हीला घाई-घाईतच करण्याचा ’सल्ला’ देतो.)

4.Your father?
बॅंकेत अधिकारी आहेत. आजकाल नगरला बदली असल्यानं शनिवार-रविवार आले की ताणुन देण्यातच दिवस घालवतात.
5.Your favorite food?
तसे बरेच पदार्थ आहेत आवडीचे. पण सांगायचेच झाले तर, आम्रखंड-पुरी, पुरणपोळी, उकडीचे मोदक, आणि मिसळ!
6.Your dream last night?
अं... बहुतेक काल रात्री काही स्वप्नं पडलंच नाही.
आणि पडलंच जरी, तरी ते आठवणं तसं कठीणच. 7.Your favorite drink?
कोल्ड कॉफी!! ती पण ’दुर्गा’ची. किंवा मग घरी बनवलेली.
8.Your dream/goal?
मला आय.टी. जगात स्वतंचं असं स्वतंत्र अस्तित्व तयार करायचंय... असं अस्तित्व की ज्यातुन खरोखरच्या गरजुंना व्यवस्थीत उत्पन्न मिळेल आणि मला सुद्धा.
9.What room are you in?
माझ्या खोलीत.. जी बऱ्याच वेळा माझं ऑफिस म्हणुन सुद्धा वापरली जाते.
10.Your hobby?
वाचन - मला पुस्तकं वाचायला खुप आवडतं. भटकंती - मला गाडीवरुन/सायकलवरुन इकडं-तिकडं.. खास करुन घाट रस्त्यात फिरायला सुद्धा खुप आवडतं.
11.Your fear?
नो फिअर! मी (शक्यतो) नाही घाबरत कशाला. पण कधी कधी अति-सावध असतो मी.
12.Where do you want to be in 6 years?
पुढच्या सहा वर्षात मला माझं वर सांगितलेलं स्वप्न पुर्णपणे सत्यात उतरवायचंय. ’द अल्केमिस्ट’ या पुस्तकाचा माझ्यावर जबरदस्त पगडा आहे, आणि त्यामुळंच मला
13.Where were you last night?
माझ्याच घरी!
14.Something that you aren’t diplomatic?
सहसा मी डिप्लोमॅटीक नसतोच. अगदीच गरज पडली तरंच.. पण माझ्या निकटच्या लोकांच्या बाबतीत कधीच नाही!
15.Muffins?
ही काय विचारायची बाब झाली??!!
16.Wish list item?
हं... सध्या तरी काही गोष्टी आहेत या यादीत.
१ - सायकल. (कारण मला सायकलवर फिरण्याची फार हौस आहे.)
२ - एखादं छानसं पुस्तक
३ - ऍपलचं मॅकबुक
17.Where did you grow up?
नाशिक. माझ्या आयुष्यातली जवळ-जवळ २० वर्ष मी नाशिकमध्ये घालवलीत.
18.Last thing you did?
कालच महेश आणि भरत सोबत बनेश्वर, नारायणपुर आणि जेजुरीला जाऊन आलो. मी माझ्या ऍक्टीवावर आणि ते दोघं महेशच्या मोटरसाईकलवर.
19.What are you wearing?
टी-शर्ट आणि ३/४ पॅंट.
20.Your TV?
घरात ऑप्टोनिकाचा टि.व्ही. आहे, पण मी तो सहसा पहात नाही. पाहिलाच तर फक्त डिस्कव्हरी/नॅशनल जिओग्राफीक चॅनल, नाहीतर क्रिकेटची मॅच.
21.Your pets?
नाही, अजुन तरी नाहीये.
22.Friends
माझं मित्र-मंडळ तसं बऱ्यापैकी मोठ्ठं आहे, दोन-तीन फ्रेंड-सर्कल्स आहेत.
23.Your life?
जशी तुमची-आमची असते तशीच! कभी खुषी कभी गम, कुछ भी हो इधर, पर इस बंदे मे है निभाने का दम!!

24.Your mood?
माझा मुड बऱ्याचदा मस्तीचा असतो. (जाम मस्तीखोर आहे मी.) कधीतरी शांत असतो मी तसा! अगदीच नाही असं नाही..!!
25.Missing someone?
नाही. का कोण जाणे पण मी सहसा कोणाच्यात अडकुन पडत नाही. "out of focus is out of mind" असा प्रकार होतो माझा. माहीत नाही हे चांगलं की वाईट ते...
26.Vehicle?
होंडा ऍक्टीवा. काळा रंग.. म्हणुन मी तीला "ब्लॅक बर्ड" म्हणतो.
27.Something you’re not wearing?
हातातलं घड्याळ. पण मी ते बाहेर जातांनाच घालतो फक्त.
28.Your favorite store?
नाहीच! मला शॉपींगचा भयंकर कंटाळा आहे. तुम्हाला माहीतीये? मी दिवाळीचं माझं शॉपींग चक्क अर्ध्यातासात उरकतो...!
29.Your favorite color?
पिवळा. खासकरुन फ्रेश पिवळा रंग. निळा सुद्धा आवडतो - आकाशी निळा.
30.When was the last time you laughed?
कालच! मी दिवसातुन बऱ्याचवेळा खिदळत असतो.
31.Last time you cried?
आठवत नाही. बहुतेक दोन वर्षांपुर्वी असावं.
32.Your best friend?
भरत आणि महेश. भरत हा माझा ग्रॅज्युएशनपासुन चा मित्र आहे, तर महेश हा चक्क बालवाडीपासुनचा!
33.One place that you go to over and over?
अशा दोन जागा आहेत.
१ - खडकवासला. मला तिथं शांतपणे बसुन तासन-तास पाण्याकडं बघत बसायला आवडतं.

२ - संभाजी पार्क.

34.One person who emails me regularly?
खुप लोक आहेत असे!
35.Favorite place to eat?
पुण्यात - गुडलक - बनमस्कापाव आणि चहा, ऑम्लेटचे वेगवेगळे प्रकार
नाशिकमध्ये - विहार (गंगापुर नाका) - मिसळ!
कोल्हापुरमध्ये - फडतरे - मिसळच.
आता टॅगायची पाळी माझी!
मी टॅगतोय या मंडळींना.. ’का?’ ते सुद्धा लिहीलंय पुढेच!

विरेंद्र तिखे - याची फोटोग्राफी तर अप्रतिम आहे!
भुंगा, महेंद्र, मंदार जोशी, विशाल तेलंग्रे - या सगळ्यांचेच ब्लॉग खुपच छान आहेत, आणि मी नेहेमी यांचं लिखाण वाचतो.
कांचन कराई - यांच्या कथा खरंच खुप इंटरेस्टींग असतात. मी यांच्यासुद्धा कथा वाचतोय.

ही सगळी मंडळी ट्विटरवर सुध्दा आहेत. त्यांचे ट्विटरवरचे पत्ते असे:
विरेंद्र तिखे, भुंगा, महेंद्र, मंदार जोशी, विशाल तेलंग्रे आणि कांचन कराई
तुम्ही कोणाला टॅगताय मग?

匿名 # 2009年12月26日土曜日7:52:49
Prabhas Gupteprabhas # 2009年12月26日土曜日7:58:24
匿名 # 2009年12月26日土曜日10:20:03
匿名 # 2009年12月27日日曜日5:50:07
匿名 # 2009年12月27日日曜日13:36:57
匿名 # 2009年12月28日月曜日6:48:12
匿名 # 2009年12月28日月曜日6:49:13
匿名 # 2009年12月29日火曜日9:08:13
匿名 # 2009年12月30日水曜日11:48:40
Prabhas Gupteprabhas # 2009年12月31日木曜日9:00:43
Prabhas Gupteprabhas # 2009年12月31日木曜日9:03:22
बाय द वे, मी घेतली सायकल.
Prabhas Gupteprabhas # 2009年12月31日木曜日9:06:09
धन्यवाद!
@ अपर्णा
हो, ही माहिती माझ्याबद्दलच आहे. काही शंका?
匿名 # 2009年12月31日木曜日9:16:34
匿名 # 2010年1月1日金曜日15:24:00
匿名 # 2010年1月1日金曜日15:24:43