कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

माझा अनोखा प्रयोग

, , ,

"दुनिया गोल आहे" असं म्हटलं जातं. खरं तर त्यातला मतितार्थ भौगोलिक जास्त, आणि त्या खालोखाल योगा-योगाचा.
कुठंतरी मगाशी हेच वाक्य वाचलं आणि माझ्या डोक्यात हा किडा वळवळायला लागला. (तसा एरवी गाढ झोपलेलाच असतो हा किडा.)
मी विचार केला, ही दुनिया पैशाच्या बाबतीत पण तितकीच गोल आहे का? पैसे सुद्धा असेच फिरुन आपल्याला परत मिळु शकतात का??

म्हणुन मग मी एक छोटासा प्रयोग करायचं ठरवलंय. याचा निकाल कधी लागेल, कोण जाणे... पण निकाल मात्र नक्की लागावा अशी माझी इच्छा आहे. smile

मी काय केलंय, एका रु. १०० च्या नोटेवर मी माझ्या नावाची आद्याक्षरं लिहीली आहेत, आणि त्याखाली आजची तारिख टाकली आहे.

उद्या मी ही नोट कुठेतरी खर्च करेन. बघुया मला ही परत कधी मिळते का ते...
तुम्हाला जर कधी ही नोट मिळालीच, तर मला नक्की कळवा. म्हणजे कळेल ही नोट कशी फिरतेय ते. smile
आणि तुम्हाला माहीत आहेच, कोणी तिच्यावर आद्याक्षरं आणि तारीख टाकलीये ते! wink

डोन्ट क्लिक.इटमराठी ब्लॉगर्स मेळावा पुणे २०१०

Comments

Anonymous Monday, January 11, 2010 3:07:36 PM

अनिकेत writes: लय भारी कल्पना आहे, माझ्याकडे आली ही नोट तर तुला नक्की कळवेन

Prabhas Gupteprabhas Monday, January 11, 2010 3:23:53 PM

@ अनिकेत
कळवण्यासाठी ’ती’च नोट पाठवुन दिलीस तर "सोने पे सुहागा" होईल. p

Anonymous Tuesday, January 12, 2010 10:40:11 AM

meera writes: WOW VERY NICE ...MAZYA KADE JAR TUMACHI NOTE AALI NA TAR MI TI NAKKI JAPUN THEVEN AANI SAGALYANA SANGE KI PRABHAS CHI TI NOT MALA MILALI....JICHYA VAR TYACHA AUTOGRAPH VAJA ADYAKHSAR AAHET...... E ek bhanatt IDEA ahe..SAMAJA AAPN JAR BAKSHIS LAVAL TAR? MHANAJE ...aika ho aika jyala konala hi not melel tyla mr prabhas kadun RS.....rokh rakkam bakshis milel hooooooo. (ata he varachi rekami jaga amount takun tumhi bharayachi ok)

Prabhas Gupteprabhas Tuesday, January 12, 2010 1:42:16 PM

@ मीरा:
नाही, नको.. असलं काही नको. उगाच माझंच दिवाळं निघायचं नाहीतर...! wink

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies