मराठी ब्लॉगर्स मेळाव्याचं इति-वृत्त
Sunday, January 17, 2010 2:28:19 PM
अखेर इतके दिवस सुप वाजत असलेला ’मराठी ब्लॉगर्स मेळावा’ पार पडला.
अत्यंत सुरेख असा हा कार्यक्रम झालाय आजचा.सुमारे ६० लोकांनी हजेरी लावलेली, त्यापैकी जवळ-जवळ ३८ लोकं हे मराठी ब्लॉगर्स होते! म्हणजे वाचकांचा आणि ब्लॉगबद्दल उत्सुकता असलेल्यांचाही प्रतिसाद अपेक्षेपेक्षा चांगला होता तर!!
या यशस्वी मेळाव्याबद्दल सुरेश काका, अनिकेत आणि दिपक शिंदे यांचं मनापासुन अभिनंदन! आणि त्यांना ज्यांनी-ज्यांनी मदत केली त्यांचे कौतुक!

सुरुवातीला अनिकेतनं प्रास्ताविक केलं, त्याच्या पाठोपाठ सुरेश काकांनीसुद्धा एक छोटसं भाषण केलं.
त्यानंतर सुरु झालं ते ओळख करुन घेण्याचं सत्र! आलेल्या ब्लॉगर्सनी आपली आणि आपल्या ब्लॉगची ओळख करुन दिली.
ओळखींनंतर छोटेखानी चर्चासत्रही पार पडलं. पण सुरु व्हायला वेळ झाल्यानं आणि बरेच लोक हे एकमेकांना भेटण्यात जास्ती उत्सुक असल्यानं चर्चा मात्र लवकरच आटोपती घेतली गेली. पण तेवढ्या वेळातही बरेच चांगले विषय मांडले गेले.
चर्चेचा वृत्तांत असा:
- मराठी ब्लॉग्सनी एकत्रीत येऊन काहीतरी उपक्रम तर करावाच, पण त्याआधी ’मराठी’ला आंतरजालावर आणणारे घटक म्हणुन समाजापुढं यावं. यात मराठी मिडीया (दृष्य आणि कागदी) सुद्धा मदत करेल. पण त्यासाठी नियमीतपणे लिहीलं जाणंही आवष्यक आहे. ’तेरड्याचा रंग तीन दिवस’ असा प्रकार नको.
- मराठी ब्लॉग्सना साहित्य संमेलनांमधुनही ’कव्हरेज’ किंवा एक व्यासपीठ मिळावं. संमेलनाध्यक्षांच्या भाषणाला वजन असल्यानं किमान त्यात तरी मराठी ब्लॉग्सची दखल घेतली जावी.
- साहित्य संमेलनाशी ब्लॉगर्सचे सुत जुळणं अवघड वाटत असल्यास समांतर असं ’मराठी ब्लॉगर्स संमेलन’ घेण्याचाही पर्याय आहे.
- जमले तर साहित्य संमेलनात मराठी ब्लॉग्सबद्दल माहिती देणारा स्टॉल लावावा, आणि त्यात मराठीत लिहील्या जाणाऱ्या ब्लॉग्सबद्दल माहिती दिली जावी.
- लेखांच्या चोरीचाही विषय निघाला. परंतु त्यावर कोणताही तोडगा/उपाय चर्चिला गेला नाही. "चोरी कशी?", "लेखात फेरफार किती?", "ब्लॉगलेखकांनं कॉपी विरोधात आधीच काही पावलं उचलली आहेत का? जसे की कॉपीराईट" इत्यादी मुद्द्यांवरच ही चर्चा झाली.
पण एकंदरीत मिडिया प्रतिनिधींचं म्हणणं असं होतं की, आधी ’मराठी’ ब्लॉगर्स म्हणुन समाजापुढं यावे, वेगवेगळ्या मार्गांनी.. जसे की मिडीया, साहित्य संमेलन इत्यादी. येऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना हे मिडीया प्रतिनिधी ब्लॉगबद्दल भेट घेऊन माहिती देणार आहेत.
मला तरी असं वाटतं की साहित्य संमेलनाशी निगडीत काय करावं हा विषय तुर्तास तरी चर्चिला जाऊ नये. आधी मराठी ब्लॉगर्सचा एक गट म्हणुन आपण पुढं येणं महत्वाचं.
अजुन एक नमुद करण्यासारखी बाब म्हणजे, मराठी ब्लॉगर्ससाठी एक गुगल ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. याच्यामार्फत आपण सगळेच मराठी ब्लॉगर्स आपले प्रश्न, विचार इत्यादीची आदान-प्रदान करु शकु. एक ई-मेल लिस्ट म्हणुनही हा ग्रुप काम करेल. जेणेकरुन पुढील उपक्रमांची माहीती सगळ्यांपर्यंत अधिक परिणामकारकपणे पोहोचेल. तिथं आलेल्या सर्व मराठी ब्लॉगर्सची माहिती (नांव, पत्ता, संपर्क क्रमांक, ब्लॉगचा पत्ता इत्यादी) घेण्यात आलेली आहे. आणि लवकरच आपण सगळे मराठी ब्लॉगर्स या ग्रुपमध्ये समाविष्ट होऊ.
औपचारिक मेळावा संपल्यावर मात्र अनौपचारीक गप्पांचा नुसता महापुर आला होता. प्रत्येकजण आपण वाचत असलेल्या ब्लॉगच्या लेखकाला जाउन भेटत होता, त्याच्याशी चार शब्द बोलत होता...
माझा ब्लॉग वाचणारे बऱ्यापैकी लोक आहेत की!! त्या सगळ्यांना प्रत्यक्ष भेटुन आनंद झाला. ज्यांचे ब्लॉग मी स्वतः वाचतो, त्यांच्याशी गप्पा मारतांना खुपच छान वाटत होतं. ज्यांना भेटलो त्यांना आवर्जुन धन्यवाद दिले मी.

ता.क. १
बऱ्याच लोकांनी फोटो काढलेत. मी स्वतः मात्र फोटो काढलेले नाहीत. (कारण मी लाईव ट्विट करत होतो!)
सुरेश काकांनी प्रत्येकाकडुन फोटो मागितले आहेत, त्यांना मिळाले की त्यांच्या ब्लॉगवर वगैरे बघायला मिळतीलच!
ता.क. २
’ई-सकाळ’वर या मेळाव्याची बातमी आली आहे. तुम्ही ही बातमी इथं वाचु शकता.

Anonymous # Sunday, January 17, 2010 2:51:29 PM
Anonymous # Sunday, January 17, 2010 2:53:57 PM
Anonymous # Sunday, January 17, 2010 2:57:16 PM
Anonymous # Sunday, January 17, 2010 3:05:46 PM
Prabhas Gupteprabhas # Sunday, January 17, 2010 3:13:12 PM
धन्यवाद!
Prabhas Gupteprabhas # Sunday, January 17, 2010 3:16:00 PM
हो, कार्यक्रम छान झालाय. मी माझ्या नजरेनं इथं वृत्तांत दिलाय. हळुहळू अनिकेत, सुरेश काका, दिपक शिंदे यांच्या ब्लॉगवर सुद्धा येईल त्यांच्या नजरेतुन.
आणि हो, बहुतेक उद्याची वर्तमानपत्रं आहेतच! किमान ’सकाळ’मध्ये तरी आहेच.
Prabhas Gupteprabhas # Sunday, January 17, 2010 3:19:48 PM
आयोजक मंडळी खरंतर भरपुर अभिनंदनास पात्र आहेत.
Prabhas Gupteprabhas # Sunday, January 17, 2010 3:22:26 PM
आम्ही सगळ्यांनीच तुम्हाला खुप miss केलंय. तुम्ही असायला पाहीजे होतंत. असो.
फोटोंची मी सुद्धा वाट बघतोय.
Anonymous # Sunday, January 17, 2010 3:25:30 PM
Prabhas Gupteprabhas # Sunday, January 17, 2010 3:32:35 PM
हो, खरंच चांगला कार्यक्रम तुम्ही चुकवलात.
विशाल तेलंग्रेsuruwat # Sunday, January 17, 2010 3:46:44 PM
- विशल्या !
Prabhas Gupteprabhas # Sunday, January 17, 2010 4:11:43 PM
Anonymous # Sunday, January 17, 2010 11:29:43 PM
Anonymous # Monday, January 18, 2010 5:59:30 AM
Anonymous # Monday, January 18, 2010 6:00:17 AM
Prabhas Gupteprabhas # Monday, January 18, 2010 7:11:32 AM
Originally posted by हेरंब:
हो हेरंब, कार्यक्रम खरचं छान झालाय. मी आशा करतो की ट्विट्स चांगल्या होत्या, आणि तुम्हाला मेळाव्यात काय-काय चाललंय ते नीट कळत होतं.
Prabhas Gupteprabhas # Monday, January 18, 2010 7:14:04 AM
Originally posted by कांचन कराई:
Anonymous # Monday, January 18, 2010 2:16:40 PM
Prabhas Gupteprabhas # Monday, January 18, 2010 3:55:07 PM
धन्यवाद!
तुमचं अभिनंदन बाकीच्यांपर्यंत पण पोहोचवेन!
Anonymous # Wednesday, January 20, 2010 3:05:54 PM
Prabhas Gupteprabhas # Wednesday, January 20, 2010 3:26:34 PM
तुमच्या नविन ब्लॉगसाठी माझ्या शुभेच्छा!