काही छान कविता...

Subscribe to RSS feed

व्यथा...

*******************************************************
न कळनार तुला मन माझे कधी,
न कळनार ह्रदय व्यथा कधी.
कळेल तेव्हा नसेन राहीलो मी...

वाईट वाटेल मना तुझ्या, बोचातिल मना वेदना तुझ्या.
कदाचित करशील ही इच्छा भेटण्याची प्रकट,
पण तो योग कधी न जुळायचा..
कारण नसेन राहीलो तुझा मी...

पश्चातापाच्या आगीत झोकुन देशील स्वत्तला,
त्या आगीच्याही ज्वाला विझवायला, नसेल त्या वेळी तुझ्या जवळ मी.
कारण नसेन राहीलो तुझा मी...

कदाचित ढळशील हि चार आश्रु, त्या आश्रुनाही कळाली असेल किंमत माझी.
त्या आश्रुना तळहातावर झेलायला नसतील माझे हात त्या वेळी.
कारण नसेन राहीलो तुझा मी...

आपल्या संगतितल्या चार आठवणी, तीच तूला आयुष्याची सोबत.
तेच आपले भाग्य कदाचित..
कारण नसेन राहीलो तुझा मी...

********************************************************

मुक्तता...

मुक्तता...

मरण असे दे देवा, ज्यात असेल आत्म्याची मुक्तता.

मरण असे दे देवा, ज्यात नसेल जगण्याची सक्ती.

मरण असे दे देवा, ज्यात असेल वेदनांची समाप्ती.

मरण असे दे देवा, वाटो वरदानाची प्राप्ती.

मरण असे दे देवा, मरून ही उरेन मी.

मरण असे दे देवा, नसून ही असेन मी.

उशीर..

उशीर झाला हे तुला कळण्यासाठी,

का तुझा विचार आला पुन्हा छळण्यासाठी..?

का असा थांबुन गेलो जरा वळण्यासाठी...?

भुललो ना मी कधी कोणत्याच अमिषाला,

दिला होता तुला 'तो' शब्द पाळण्यासाठी.

वाचले असतेस तु कधी पान माझ्या मनाचे,

नसता का तुझा विचार आला पुन्हा छळण्यासाठी..?

का असा थांबुन गेलो जरा वळण्यासाठी..?

उशीर झाला हे तुला कळण्यासाठी...!

जवळ...

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडतांना असह्य यातना व्हावी.

डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे.

स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या कहीच नसावे.

कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा.

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी.

कुणाची इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा.

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी.

कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे 'मी पण' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देवून जागे करावे...

एक थेंब ...

एक थेंब...

एक थेंब .... पानावर सजलेला..
हिरवाईच्या रंगात हिरवळलेला..

एक थेंब .. अमृतवेलावर लटकलेला,
धरती चुंबनाच्या प्रतीक्षेत तहानलेला..

एक थेंब .. कमळाच्या देठावर आधारलेला,
ओघळण्यासाठी मग लय कशाला हवीये त्याला..

एक थेंब ... तळ्यातल्या थेंबाबरोबर मिसळलेला,
आपणच तळे झालो या आनंदाने भारावलेला..

एक थेंब .. वार्‍यात उंच झेपावलेला,
गारव्याच्या शहारा मग त्याने सर्वत्र पांघरलेला..

एक थेंब ... थेंबाथेंबातून बरसलेला,
शिस्तीच आहारी मग सरींच्या मर्यादेत सांडलेला..

एक थेंब ... परिश्रमाच्या घामातला,
जिंकण्याची उमेद बाळगलेला..

एक थेंब... कळीच्या गाभार्‍यातला,
समांगाने फुलात उमलवून गेला..

एक थेंब.. ओठांच्या पाकळीतला,
गुलाबी नाजूक ओठांशी संवादलेला...

अन एक थेंब अखेर... आठवणीच्या स्पंदनातला,
ओल्या पापण्या अन ओल्या कडांतून मना ओलावलेला..

शब्द..

शब्द ह्रदय जोडुन जातात...,

शब्द ह्रदय तोडुन जातात..,

शब्द कधी काहीही न करता मोठा खेळ खेळून जातात,

शब्द कधी विषारी होतात आणि नाते तोडुन टाकतात,

शब्द मर्यादा न बाळगता कधी काहीही बोलुन जातात,

शब्द कधी मनामध्ये काट्यांचे घर बनवून जातात,

शब्द एखादा ऎकण्यासाठी कान जन्मभर वाट पाहतात,

शब्द शब्द लिहता आयुष्याची पाने उलटून जातात,

शब्दांबद्दल किती लिहावं?...

शब्दच अपूरे पडुन जातात.

(संग्रहीत..)