Skip navigation.

Log in | Sign up

काही छान कविता...

उशीर..

उशीर झाला हे तुला कळण्यासाठी,

का तुझा विचार आला पुन्हा छळण्यासाठी..?

का असा थांबुन गेलो जरा वळण्यासाठी...?

भुललो ना मी कधी कोणत्याच अमिषाला,

दिला होता तुला 'तो' शब्द पाळण्यासाठी.

वाचले असतेस तु कधी पान माझ्या मनाचे,

नसता का तुझा विचार आला पुन्हा छळण्यासाठी..?

का असा थांबुन गेलो जरा वळण्यासाठी..?

उशीर झाला हे तुला कळण्यासाठी...!

जवळ...मुक्तता...

Comments

Rahul 5. January 2009, 06:28

.... प्रमोद , तुझ स्वागत.

............... छान , तु सुद्धा लिखाण सुरु केलस तर.
सुरुवात तर एकदम छान झाली आहे. छान कविता आहेत.
.... असच भरपुर लिखाण कर.
.......................... तुला भरपुर शुभेच्छा!

..........................................राहुल

Write a comment

You must be logged in to write a comment. If you're not a registered member, please sign up.