Skip navigation.

राहुल

October 2008

( Monthly archive )

सोनचाफा...

.....सुर्य़ नुकताच मावलती कडे गेला आणि सोनचाफा शहारुन गेला...हे आता दररोजचेच झालय, जर एखादि घटना नेहमि्च होत असेल तर त्या गो्ष्टीची सवय होते ...
गेले पाच दिवस झाले दररोज येथे ये्वुन बसतोय...सोनचाफा दररोज नवीनच वाटतो ..... अगदि तीच्या सारखा!
......... तशी माझी आणि त्या्ची खुप जु्नी ऒळख आहे, त्यावेळी तॊच माझा मित्र होता. आम्हि खुप गप्पा मारायचो ..अगदि मनसोक्त!
....... आज पासुन काही वर्षा पुर्वि ची गोष्ट आहे... मला आणि सो्नचाफ्याला आजुन एक मित्र भे्टला. तीच नाव मला आजु्नहि माहित नाही पण त्यामुळे आमच काहीही बिघडल नाहि.... मी तीच एक छानस नाव ठेवल आहे "सो्नचाफा" . आमची पहीली भेट सोनचा्फ्याच्या साक्षीने झालेली म्हनुन.
...... एखाद कापड जस एका एका धाग्या पासुन बनतं तसच नात्याचं सुध्दा असत , ते बनन्यासाठि खुप काळ जावा लागतो अस काहि नाही पण ते घट्ट होन महत्वाचे असते.
एक एक धागा कसा विणला गेला असेल ते त्यालाच माहीत, आज फक्त आठवणी आहेत.
..... रवि्वारचा दिवस होता , नेहमिप्रमाणे फीरायला गेलो होतो, सोनचाफ्याचा गंध दरवळत होता आणि मझी पावले आपोआप तिकडे जात होती.
ती्थे आगोदरच कोणीतरी आल होत, फुलांच्या माळा करीत बसलेल. सो्नचाफ्या बरोबर गप्पा मारणार अजुन एक तीथे कोणीतरी होत. सोनचाफा जास्त खुश होता आज ... खुपच मोहक गंध दरवळत होता तो.
...... ओळख व्हायला जास्त वेळ लागला नाही .. आणि मग सोनचाफ्याला टुक टुक करत आम्हि गप्पा मारत बसलो. दोन दिवसासाठी ती आली होती , ते दोन दिवस... कधिही न विसरणारे . खुप गप्पा मारल्या आम्ही ... मनसोक्त ! मी म्हणालो ना एखाद कापड जस एका एका धाग्या पासुन बनतं तसच नात्याचं सुध्दा असतं, तसच आमच नात होत . ते घट्ट व्हायला वेळ लागलाच नाही.
....... ती गेली आणि पुन्हा एकदा मी आणि सोनचाफा एकटाच ...मात्र जाताना दो्न फुले देवुन गेलि , आजही त्यांचा गंध दरवळतो.
आता परत कधी भेट होनार माहीत नाही पण आजहि कधि सोनचाफ्याचा गंध येतो तेव्हा आठवतो तो "सोनचाफा" मनास मोहरुन टाकणारा ......








दिपावलि च्या शुभेछा

आपणाला दिपवलि आनंदाचि जावो ..

लवकरच भेटु....

सुस्वागतम

मित्र हो मी माझा ब्लॊग सुरु करत आहे
आपणा सर्वान्च स्वागत