Wednesday, 26. November 2008, 09:06:04
राहुल
प्रत्येकाच्या जीवणात
एक क्षण असा येतो
तो प्रत्येकाच
जीवणच बदलून देतो
मनातील वादळ शांत होताना
विचार सगळे वाहुन जातात
आपल्या बरोबर ते जाताना
दुःखाच ओझ घेऊन जातात
जगायच असेल तर
अस जगा
स्वतः दुःखात असाल तरी
दुसय्रांना आनंद देत रहा
Tuesday, 25. November 2008, 11:19:07
राहुल
कितीवेळा ठरवल
तुला आता विचारायचं
तुझ्यापासुन आता
काही नाही लपवायचं
पण... का कुणास ठाऊक
मन माझ भित होत
तुझ्यापासुन दुर जाण्याचा
मार्ग ते शोधत होत
पण... प्रत्येक मार्गावर
एक वळण होत
आणि ते वळण मला
तुझ्यापा्शीच नेत होतं
Tuesday, 25. November 2008, 05:31:47
राहुल
प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं
घडत नसत कधी
सर्वकाही मनासारखं
मिळत नसत कधी
सर्वकाही मनासारखं मिळाल तर
आयुष्याला अर्थ राहत नाही
म्हणुन तर दॆवं
आपल्या बरोबर राहत नाही.
Tuesday, 25. November 2008, 05:25:16
राहुल
आपल्याला जे हव असतं
ते मिळ्तच अस नाही
जे काही मिळत
ते आपलच असत अस नाही
पण... तरीही
मिळालेल सर्वकाही
आपण आपल माणत असतो
म्हणुन तर
आपण आपले राहत नसतो
पण... तरीही
आपण जीवण जगत असतो
म्हणुन तर
आपण यास
माणुस जन्म म्हणतो
Monday, 24. November 2008, 04:17:11
राहुल
आठवण तु्झी आली की
खुप काही सुचत
पण... त्यामध्ये
तुझ्याशिवाय दुसर काही नसतं
तुला कस कळल नाही
मन माझ वेडे गं!
का तू जाणून होतीसं
वेडेपण माझ गं!
खुप काही सांगायच होत
मला तू भेटल्यावर
पण... सगळ काही विसरुन गेलो
तू समोर दिसल्यावर
Monday, 24. November 2008, 04:06:25
राहुल
प्रेम म्हणजे
वेडेपणा आहे
अस तु एकदा
म्हणाली होती
पण...
तुला कस महित ?
वेडेपण काय असतं
अग शहाणे
त्या्साठी एकदा तरी प्रेम कराव लागत....
Saturday, 22. November 2008, 10:13:31
राहुल
प्रेम म्हणजे काय असतं?
तुझ्याकडे पाहण,पाहतच राहण
डोळ्यात तुझ्या
हरवुन जाणं...
Friday, 21. November 2008, 10:36:17
राहुल
आठवण तुझी आली की
मन माझ भरुन येत
डोळे बंद के्ले की
रुप तुझ समोर येत
Thursday, 20. November 2008, 08:53:08
राहुल
तु गेली तेव्हा
संध्याकाळची वेळ होती
का बर तु मला
रात्र ती देउन गेली...?
आयुष्याची वाटही तेव्हा
खडतर होती
का बर तू मला
जखम ती देउन गेली...?
रात्रभर फुंकर मारत होतो तेव्हा
जखमही ती बरी होत गेली
का बर तु मला
जन्मखुण ती देउन गेली...?
बराच वेळ तेव्हा
चांदण्यांनी मला साथ दिली
का बर तु मला
अमवस्या देउन गेली...?
रात्रीनंतर उजाडलही तेव्हा
प्रकाशाची तहान तु देउन गेली
का बर तु मला
एकटेपण देउन गेली...?
बरेच दिवस गेले तेव्हा
पॊर्णिमाही जवळ येत गेली
का बर तु मला
चंद्राची चाहूल देउन गेली...?
Thursday, 20. November 2008, 08:26:51
राहुल
मनात खुप काही
साचुन राहीलयं
काळ्याकुट्ट
ढगासारख
दिवसाला घेऊन
क्शितीजापार उन गेलयं
अन मन भरुन आलयं
रात्रिच्या चांदण्यासारखं
सोबतीला चंद्रही नाही
अमवस्येच्या रात्रीसारखं
मन मात्र फिरतय
बिनधास्त वटवाघळासारखं
« Prev 1 2 3 4 Next »
Showing posts 11 -
20 of 33.