सुरुवात...
Thursday, 1. January 2009, 10:46:39
.........पहिल प्रेम,पहिली मॆत्री, पहिली शाळा , .... गंमत असते ना पहिल्या पहिल्या गोष्टींची.
आज नविन वर्षाचा पहिला दिवस, आणि पहिला दिवस म्हणला की संकल्प आलेच.
......... मला आजही आठवतय माझी पहिली कविता ज्या कविते पसुन मी कविता लिहायला सुरुवात केली.
तो दिवस १ जानेवारी २००० होता. मा्झी पहिली कविता....पहा कशी वाटते.
आज मी ईथे थांबतोय
मागे वळून पाहण्यासाठी...
किती मिळवलं किती गमावलं
एकत्र मोजण्यासाठी...!
खूप काही गमावलय मी
थोडफार मिळवण्यासाठी...
आता मला लढायचयं
खूप काही मिळवण्यासाठी...!
आज मी सुरुवात करतोय
पु्ढे पुढे जाण्यासाठी...
संघर्ष करायचायं मला
सर्वकाही मिळवण्यासाठी...!
प्रयत्न करावे लागतील मला
मिळवलेल टिकवण्यासाठी...
आजपासून लढायचयं मला
खूप यश मिळवण्यासाठी...!
कधिही आता थांबायच नाही
मागे वळुन पाहण्यासाठी...
प्रयत्न आता करायचे फक्त
पु्ढे पुढे जाण्यासाठी...!







