" क्षण "
Wednesday, 5. November 2008, 06:35:53
............ एक क्षण, बस बरच काही घडत, बरच बिघडत,
क्षण क्षण साठून आपल आयुष्य घडुन जातं. ही कविता ही बरच काही सांगुन जाते.
पहा तुम्हाला कशी वाटते.
प्रत्ये्कजण आपल भावविश्व ठरवताना
काळाशी एकरुप होऊण जातो
काळ कोणासाठि थांबत नसला तरी
प्रत्ये्कजण त्यातिल एक क्षण घेतो
कोणत्यातरी एका क्षणी तो हरवून जातो
असाच एका क्षणी तो ताळ्यावरही येतो
कोणतातरी एक क्षण त्याला मनात टोचत असतो
कोणतातरी एक क्षण मनात नाचतही असतो
एक एक क्षण साठवत असताना
खुप काही घडुन जातं
तेच क्षण आठवले की मग
आपल मन बिघडून जात
काळ कोणासाठी थांबत नाही
ते एक बर असत
प्रत्येक क्षण मनात राहत नाही
हे मात्र खर असत.






