Skip navigation.

राहुल

का बर तु मला.......?

तु गेली तेव्हा
संध्याकाळची वेळ होती
का बर तु मला
रात्र ती देउन गेली...?

आयुष्याची वाटही तेव्हा
खडतर होती
का बर तू मला
जखम ती देउन गेली...?

रात्रभर फुंकर मारत होतो तेव्हा
जखमही ती बरी होत गेली
का बर तु मला
जन्मखुण ती देउन गेली...?

बराच वेळ तेव्हा
चांदण्यांनी मला साथ दिली
का बर तु मला
अमवस्या देउन गेली...?

रात्रीनंतर उजाडलही तेव्हा
प्रकाशाची तहान तु देउन गेली
का बर तु मला
एकटेपण देउन गेली...?

बरेच दिवस गेले तेव्हा
पॊर्णिमाही जवळ येत गेली
का बर तु मला
चंद्राची चाहूल देउन गेली...?



मनात......चारोळी .... ४

Write a comment

You must be logged in to write a comment. If you're not a registered member, please sign up.