तू...
Saturday, 6. December 2008, 07:17:26
.................... मी प्रेमात पडल्याच प्रत्येक क्षण सांगूण जातॊ.
तुम्हाला अस कधी वाटलय का? ... जेव्हा आपण प्रेमात
............... मी जेव्हा ही कविता वाचली मला खुप आवडलि. अगदि मनातल सांगून गेली. पहा तुम्हाला काय वाटत?
.................!! तू !!.................
तू जवळ नाहीस तरीही
मी एकटा कधिच नसतो,
तुझ्या अस्तित्वाचा गंध
माझ्या भोवती दरवळत असतो...
विरहाचे उन जाळते कधी
मनाची तगमग होते,
तुझ्या डोळ्यातील शीतलता
त्यावर हळूच फुंकर घालते...
तुझ्या भेटीची ओढ
थंडी होऊन अंगाला झोंबते,
तुझ्या आठवणि शाल होऊन
पांघरुण घालीत ऊब देतात...
संध्याकाळी, एकांतवेळी
आठ्वणिंचा वारा सुटतो,
माझ्या प्रत्येक श्वासागणिक
तुझ्या केसांचा सुगंध घेतो...
होतो अबोल मग मी सुध्धा
अन तुझ्यामध्ये रंगून जातॊ,
मी प्रेमात पडल्याचं,
प्रत्येक क्षण सांगून जातो...







