Skip navigation.

राहुल

एकटेपण...


................. ऎकटेपण कोणाला येत नाही, हा ते कधी येईल सांगता येणार नाही.
एकटेपणा वाटतो तेव्हा तुम्हि काय करता. आपल्याशीच गप्पा की अजुन काही.
मी जेव्हा ही कविता लिहली तेव्हा मला तर असच वाटल. तुम्हाला काय वाटत?

............!! एकटेपण !!...........

एकटेपण वाटल तर
आरश्यासमोर जाऊन उभे रहा
दिसतय का कोणी आपलं
ते शोधुन पहा...

दिसेलच कोणीतरी
मनापासून आवडलेल
ह्रदयाच्या एका कप्यात
खोलवर दडलेलं...

वाटलच तर त्याच्याशी
मनातल बोलत रहा
सांगेल तेही काहीतरी
मनापासून ऎकत रहा...

बोललच नाही काही ते
तरी तुम्ही बोलत रहा
मन मोकळ करण्यासाठी
कधीतरी एकट रहा...

तू...काही गोष्टी...

Comments

prabhas 13. December 2008, 10:16

अरे मस्तच राहुल!

खुपच छान!! खरच चांगला उपाय आहे एकटेपणावर...

Write a comment

You must be logged in to write a comment. If you're not a registered member, please sign up.