Skip navigation.

राहुल

काही गोष्टी...


....... काही गोष्टी, आपण आपल्या मनातल सगळच दुसर्यांना सांगत नसतॊ, काही गोष्टी आपल्या मनातच ठेवत असतो.
मला पण असच वाटत. मी पण काही गोष्टी मनात ठेवतो तर काही गोष्टी सांगुन जातॊ.
आता तुम्हाला ही कविता वाचल्या नंतर कळेलच. तुम्हाला काय वाटत ते जरुर सांगा.

..........................काही गोष्टी..................

काही गोष्टी अशा असतात
कुणालाही त्या सांगायच्या नसतात
आपल्याच मनात ठेवायच्या असतात...

काही गोष्टी अशा असतात
बोलून दाखवायच्या नसतात
डोळ्यानींच त्या सांगायच्या असतात...

काही गोष्टी अशा असतात
लगेचच सांगायच्या नसतात
दुसर्यांनाच समजून घ्यायच्या असतात...

काही गोष्टी अशा असतात
सारख्याच आठवायच्या नसतात
आठवण्यासाठी त्या विसरायच्या नसतात...




एकटेपण...पत्र...

Write a comment

You must be logged in to write a comment. If you're not a registered member, please sign up.