Skip navigation.

राहुल

पत्र...


..... तुम्ही कधी कोणाला पत्र लिहल असेलच, प्रेमपत्र flirt नसेल कदाचीत पण साध खुशालीच...
निदाण शाळेत असताना मित्राला पत्र लिहा हा प्रश्न तरी नक्की सोडवला असेलच की :D ... हो ना!
आताच्या काळात पत्र लिहण दुर्मिळ झालय हे खर पण, आपण सर्वांना सांगतो की पत्र/मेल लिहित जा.
.....आता तुम्हा्ला प्रश्न :confused: पडला असेल की आज कविता सोडुन हे काय लिहित बसलोय ... हो ना?
अस काही नाही बर का. तुम्ही आता ही कविता वाचली की तुम्हाला आपोआपच समजेल.


................ पत्र .............

येणारच नसलीच तर नकोच लिहू पत्र
माझी आठवण खरच व्याकूळ करत असेल
तरच लिहि...

लिहायच म्हणून नकॊ लिहू पत्र
ह्रदया्तील गुपित सांगायच असेल
तरच लिहि....

वेळ जात नाही म्हणून नको पत्र
क्षण क्षण युगापरी भासत असेल
तरच लिहि...

ऒपचारिकता म्हणून मुळिच नकॊ लिहू
प्राण कंठाशी आले
तरच लिहि...

आणि हो...
पत्र हे प्रेमपत्रच असायला हव असही नाही
मनातले विचार उत्स्फूर्त पणे
मांडत लिहि...

पोस्टमनला काम हवे म्हणून नकॊ लिहू पत्र
माझ काम नीट चालाव
म्हणून लिहि...

............. संग्रहीत

काही गोष्टी...चारोळ्या..... १०

Write a comment

You must be logged in to write a comment. If you're not a registered member, please sign up.